शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : कंत्राटी कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:21 IST

बुलडाणा: बीड येथील पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सुहास जायभाये यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १ जानेवारी रोजी काळय़ा फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबीड येथील कंत्राटी कर्मचार्‍यास मारहाणीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बीड येथील पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सुहास जायभाये यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १ जानेवारी रोजी काळय़ा फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, बीड येथील पंचायत समितीमध्ये भारत मिशन अंतर्गत समूह समन्वयक म्हणून सुहास तुकाराम जायभाये हे कार्यरत आहेत. दरम्यान, आरोपी सैय्यद नईम मुकरम याने लाभार्थी असल्याचे सांगून शौचालयाच्या पाच प्रकरणात प्रोत्साहन निधीची मागणी केली; परंतु जायभाये यांनी सदर प्रस्ताव हे योग्य नसल्याने लाभ देता येणार नाही, असे त्यास सांगितले. त्यावेळी सैय्यदने कार्यालयातच सुहास जायभाये यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जायभाये यांनी पोलिसात तक्रार दाखल केली; परंतु अद्यापही आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आली नाही. यापूर्वीदेखील कर्मचार्‍यांना अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. असे असताना कंत्राटी कर्मचारी असे समजून वरिष्ठ अधिकारी कर्मचार्‍यांना सरंक्षण देत नाहीत. उलटपक्षी कर्मचार्‍यांना धाकदपट करून त्यांना चूप केल्या जात आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना संरक्षण देऊन मारहाण करणार्‍या आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून कामकाज केले आहे. या आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष विलास निकम, जिल्हाध्यक्ष नवृत्ती शेडगे, वैभव डांगे, संतोष पाखरे, योगेश सुरडकर यांच्यासह असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा