शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : विजयी सरपंच, सदस्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:27 IST

बुलडाणा:  थेट सरपंच पदाच्या निवडीमुळे यावर्षी बुलडाणा  तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंगत आली हो ती. सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच ग्रामपंचायतीत  सर्वपक्षीय जल्लोष दिसून आला; मात्र  काँग्रेस, भाजपा, शिवसेना  आदी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा  केला आहे.

ठळक मुद्देउमाळा अविरोध : १२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीरसर्वच राजकीय पक्षांनी ठोकला दावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  थेट सरपंच पदाच्या निवडीमुळे यावर्षी बुलडाणा  तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंगत आली हो ती. सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच ग्रामपंचायतीत  सर्वपक्षीय जल्लोष दिसून आला; मात्र  काँग्रेस, भाजपा, शिवसेना  आदी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर दावा  केला आहे.बुलडाणा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७ ऑक्टोबर रोजी  मतदान घेण्यात आले. त्यात सावळा, येळगाव, सव, हतेडी खु.,  गिरडा, चिखला, दत्तपूर, ढालसावंगी, मौंढाळा, रूईखेड मायंबा,  ईरला व उमाळा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान, आज  मतमोजणी झाल्यानंतर सर्वच ग्रामपंचायतीत सरपंच पद  निवडीचा जल्लोष दिसून आला. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी  बुलडाणा तहसील कार्यालय परिसरात सकाळपासून विविध  पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी ८  वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. तर दुपारी १  वाजेपर्यंत १२ ग्रामपंचयतींचे निकाल घोषित करण्यात आले.  त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सावळा-सुंदरखेड गट ग्राम पंचायतींच्या सरपंचपदी अपर्णा राजेश चव्हाण यांनी  १,६५९ मते  घेऊन विजय मिळविला. त्यांच्या विरुद्ध सोनाली संतोष राजपूत  यांनी १,४२८ मते घेऊन उल्लेखनीय लढत दिली. तर जिजाबाई  साहेबराव रिंढे यांना १,२६६ मते मिळाली. येळगाव ग्रामपंचाय तीच्या सरपंचपदी लिलाबाई दशरथ वाघ यांनी ८९३ मते घेऊन  विजय मिळविला. सव सरपंचपदी छाया संजय गाढे यांनी ८७0  मते घेऊन विजय मिळविला. हतेडी बु. सरपंचपदी ४३४ मते  घेऊन अनिता नंदकिशोर गायकवाड विजयी झाल्या. गिरडा सर पंचपदी ७२३ मते घेऊन भरत भीमराव भिसे विजयी झाले.  चिखला ग्रामपंचायत सरपंचपदी ३९५ मते घेऊन मीरा मुकेश  वाघ यांनी विजय मिळविला. दत्तपूर सरपंचपदी संगीता गजानन  जाधव यांनी ३३९ मते घेऊन विजयी झाल्या. ढालसावंगी सर पंचपदी शेख अजीज लुकमान यांनी ९0९ मते घेऊन विजय  मिळविला. मौंढाळा सरपंचपदी राजेंद्र नामदेव जाधव यांनी ५७७  मते घेऊन विजय मिळविला. रुईखेड मायंबा सरपंचपदी १,१७८  मते घेऊन विष्णू ठकुबा उगले यांनी विजय मिळविला. ईरला  सरपंचपदी ३२२ मते घेऊन सविता भास्कर सरोदे यांनी विजय  मिळविला. 

सर्वच राजकीय पक्षांनी ठोकला दावाबुलडाणा तालुक्यातील निकाल जाहीर झालेल्या १२ ग्रामपंचाय तींवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली सत्ता आल्याचा दावा केला  आहे.  काँग्रेस पक्षाने १२ ग्रामपंचायतींपैकी ९ ग्रामपंचायतींवर  काँग्रेसचा झेंडा फडकल्याचा दावा केला आहे. तर भाजपाने १२  पैकी ६ जागेवर वर्चस्व मिळविल्याचा दावा केला आहे. तर  शिवसेनेने बुलडाणा व मोताळा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीं पैकी ७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.  तर गिरडा, गोंधनखेड, इजलापूर व मेरखेड या गट ग्रामपंचाय तीवर संपूर्ण पॅनलसह सरपंचपदी भारत भिसे निवडणूक आले  असून, ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. 

उमाळा सरपंचपदी अनिता सपकाळ अविरोधबुलडाणा तालुक्यातील उमाळा सरपंचपदी अनिता गणेश स पकाळ व इतर सात सदस्य अविरोध निवडणून आल्याची  घोषणा निवडणूक अधिकार्‍यांनी यावेळी केली. उमाळा गाव  आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे गाव असून, त्यांच्या  मार्गदर्शनाखाली सदर निवड अविरोध करण्यात आली असून,  गावाला विकास कामासाठी १0 लाखांचे बक्षीस देण्यात येणार  आहे.