शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: व्हीसीद्वारे जि.प.च्या अर्थसंकल्पास कार्याेत्तर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 10:44 IST

जिल्हा परिषदेच्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासही या एक प्रकारच्या ऐतिहासिक सभेत कार्याेत्तर मंजुरीही मिळवली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या इतिहासात व्हीसीद्वारे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पारपडली. दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाची आपतकालीन स्थिती उद्भवल्यानंतर जि. प. सिईओंनी कायद्याच्या चौकटीत मिळालेल्या अधिकाराचा वापर करून मंजूर केलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासही या एक प्रकारच्या ऐतिहासिक सभेत कार्याेत्तर मंजुरीही मिळवली.त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या इतिहासात हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागले. ऐरवी निवडणुका तथा तत्सम बाबीमुळे बऱ्याचदा जि. प. सिईओंनी त्यांच्या अधिकारात अर्थसंकल्प मंजूर करून नंतरच्या बैठकीत त्यास कार्याेत्तर मंजुरी घेतली होती. परंतू यावेळचा हा क्षण काही औरच होता.जिल्हा परिषदचे सर्व सदस्य हे १३ ही पंचायत समित्यांच्या व्हीडीओ कॉन्फरसींग सेंटरमध्ये बसून त्यांनी या सर्वसाधारण सभेत सहभाग घेतला तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस जिल्हा परिषदेतील व्हीसी सेंटरमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमल बुधवत, जिल्हा परिषद सीईओ षण्मुखराजन एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लोखंडे व अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या सर्व साधारण सभेत कोरोना संसर्ग व ग्रामपंचायतीने करावयाच्या कामांचा आढावा घेण्यात आला, पावसाळ््यातील साथरोगांच्या स्थितीबाबतही माहिती जाणून घेण्यात आली. या व्यतिरिक्त काही रस्त्यांच्या कामांना, ग्रामपंचायतीमधील रखडलेल्या काही योजनांच्या कामांनाही या बैठकीत मान्यता घेण्यात आली. बुलडाणा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा २७ कोटी रुपायंच्या घरात असून व्हीसीद्वारे त्यास कार्याेत्तर मंजुरी घेतल्याने याची जि. प. च्या इतिहासात नोंद झाली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद