शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : हगणदरीमुक्तीसाठी अनोखी शक्कल; शौचालय नसल्यास धान्य पुरवठा होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:50 IST

डोणगाव : गाव हगणदरीमुक्त व्हावे, यासाठी डोणगावमध्ये अनोखी शक्कल लढविण्यात आली असून, शौचालय नसलेल्या ग्रामस्थाला धान्य न देण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे.

ठळक मुद्देडोणगाव ग्रामपंचायतीचे स्वस्त धान्य दुकानदारांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : गाव हगणदरीमुक्त व्हावे, यासाठी डोणगावमध्ये अनोखी शक्कल लढविण्यात आली असून, शौचालय नसलेल्या ग्रामस्थाला धान्य न देण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे. दरम्यान, त्यानुषंगाने गावात दवंडीही देण्यात आली आहे. परिणामी हा विषय सध्या गावात चर्चेचा विषय बनला आहे.मेहकर तालुक्यातील डोणगाव हे एक मोठे गाव आहे. या गावास राजकीय तथा व्यापारी दृष्टिकोणातून मोठा इतिहास आहे; मात्र गाव हगणदरीमुक्त होण्यात सध्या अडचण आली आहे. गावातील जवळपास १२00 नागरिकांकडे शौचालय नसल्याने स्वच्छ भारत मिशनची कामे येथे अडचणीत आली आहे.  वैयक्तिक शौचालयासाठी शासनस्तरावरून अनुदान देण्यात येत असले तरी गावात अनेकांनी शौचालय बांधलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी शौचालय निर्मितीसाठी प्रेरित व्हावे, या दृष्टिकोणातून हा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. डोणगाव ग्रामपंचायतीने डोणगावातील राशन दुकानदारांना ज्यांच्याकडे शौचालय नाहीत, अशा लोकांची यादी दिली असून, यांना शौचालय बांधण्यास प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, असे स्पष्ट केले आहे. प्रकरणी     जानेवारी महिन्यापासून जोपर्यंत शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सदर व्यक्ती आणणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचे राशन बंद करावे, असे पत्रात नमूद केले असून, तशा प्रकारची दवंडीही २३ डिसेंबरला संपूर्ण गावात देण्यात आली आहे. दुसरीकडे शौचालयासाठी असणारे अनुदान कमी असल्याने व अनेकांजवळ हक्काची जागा नसल्यामुळे त्यांनी शौचालय बांधावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालय बांधकामासाठी रेती, पाणी कुठून आणावे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वांनी शौचालय बांधकाम करावे, म्हणून शासनाच्या आदेशानुसार राशन दुकानदारांना पत्र देण्यात आले असून, यातून गाव हगणदरीमुक्त व्हावे, हा उद्देश आहे.- डी. टी. तांबारे, ग्रामविकास अधिकारी डोणगाव

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानbuldhanaबुलडाणा