शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून  दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:41 IST

बुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून दोघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी तालुक्यातील चौथा येथे घडली. या प्रकरणातील महिला व पुरुषास गंभीर अवस्थेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. 

ठळक मुद्देचौथा येथील घटना सामान्य रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विवाहबाह्य संबंधातून दोघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी तालुक्यातील चौथा येथे घडली. या प्रकरणातील महिला व पुरुषास गंभीर अवस्थेत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत. बुलडाणा तालुक्यातील चौथा येथील सुरेंद्र दिनकर मोरे (वय ३५) विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. शेजारील गावातील विवाहित स्त्रीसोबत सुरेंद्रचे प्रेमसंबंध असून, तिलाही दोन मुले आहेत. गेल्या एक वर्षापासून कुटुंबाला सोडून हे दोघेही बुलडाणा येथे राहत होते. सुरेंद्रचा पेंटिंगचा व्यवसाय आहे. दरम्यान, महिलेला तिच्या लेकरांची आठवण आल्याने २६ मार्च रोजी ती गावी गेली होती. त्यानंतर २८ मार्च रोजी तिच्या ९ वर्षीय मुलाचा मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळला होता. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र व त्याच्या प्रेयसीने मुलाचा खून केल्याचा संशय आल्याने दोघांनाही धाड पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी सुरू करण्यात आली.  दरम्यान, ८ एप्रिल रोजी सुरेंद्र व त्याच्या पे्रयसीने चौथा गावाजवळील एका टेकडीवर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच सुरेंद्रचे वडील गावक-यांसह घटनास्थळी पोहोचले. तत्काळ दोघांनाही बुलडाणा येथील  जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.   सुरेंद्र मोरेचे विवाहित स्त्री सोबत अनैतिक संबंध आहेत. सदर महिला चौथा येथे जाऊन तिच्या मुलाला भेटली. त्यानंतर दोन दिवसांनी तिच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला. या प्रकरणाच्या तपासकामी सुरेंद्र व महिलेची साक्ष घेण्यात आली होती. रविवारी या दोघांनीही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. - संग्राम पाटील, ठाणेदार, धाड पोलीस स्टेशन 

टॅग्स :buldhanaबुलडाणा