शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलडाणा : तूर घोटाळ्याच्या तपासाला मिळेना गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:19 IST

वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.

ठळक मुद्देसहा महिने उलटूनही आरोपी मोकाटच!

वरवट बकाल : तालुक्यात झालेला तूर खरेदी घोटाळा उघडकीस येऊन सहा महिने उलटले. खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. तरी पण तूर घोटाळ्याचा तपासच सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून संथ गतीने सुरू असलेल्या तूर घोटाळ्याचा तपास घोटाळेबाजांची हिंमत वाढवण्यास कारणीभूत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.तीन महिन्यांपूर्वी तूर घोटाळा उघडकीस येऊन यामध्ये एकूण २0 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात ७  व्यापार्‍यांचा समावेश असून, उर्वरित आरोपी खविसंचे विद्यमान संचालक आहेत. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर शासनाने तूर घोटाळ्याची चौकशी केली. यातून गंभीर स्वरूपाचे किस्सेदेखील बाहेर आले. यातील आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी खामगाव न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालय तारीख पे तारीख देत आहे. धिम्या गतीने तपास सुरू असल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप यातील तक्रारकर्ते प्रशांत डिक्कर, संचालक  मोहन पाटील यांनी केला आहे. सदर तूर घोटाळ्याचा तपास मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे असून, त्यांनी घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे खविसंकडून जप्त केल्याची माहिती आहे.असे असताना सदर माहिती न्यायालयात सादर करणे गरजेचे आहे. तरच यातील आरोपींना धडा शिकवला जाऊ शकतो. एक-दोन एकर शेती नावाने असताना शेकडो क्विंटल तूर कशी विकली, ज्यांनी तूरच पेरली नव्हती, त्यांनी तूर विकली. काहींनी तूर न विकताही खविसंतून धनादेश नेले अशा गंभीर बाबी चौकशीतून समोर आल्या आहेत.ही शासन व जनतेची फसवणूक नाही काय, असा सवाल शेतकरी  करीत आहेत. शासनाने नाफेड अंतर्गत तूर खरेदी योजना राबविली; पण या योजनेचा खरा मलिदा व्यापार्‍यांनीच लाटला. ही सर्व वस्तुस्थिती असताना तपास अधिकारी मात्र चौकशीच्या नावाखाली कारवाई पुढे-पुढे ढकलत आहेत. या घोटाळ्यामुळेच खविसंचे संचालक मंडळ बरखास्त करावे, असे शासनाचे निर्देश असतानाही सहकार अधिकारी श्रेणी-१ कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे.

नवीन हंगाम येऊन ठेपला तरी कारवाई नाहीतूर खरेदीचा दुसरा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे; पण मागील हंगामातील घोटाळ्याचा तपास अजून पूर्ण नाही. आरोपींना जमानतींकरिता वेळ दिला जात असून, जनतेचे लक्ष या कारवाईकडे लागलेले आहे.