शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

बुलडाणा : परजिल्ह्यातून रेतीची चोरटी वाहतूक; तहसीलची पथके रात्र गस्तीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:22 IST

बुलडाणा: एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर  रेतीची चोरटी वाहतूक होत असून, त्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात सीमावर्ती भागात दोन गस्ती पथके गेल्या आठ दिवसांपासून तैनात केली असून, आतापर्यंत जवळपास १७ लाख रुपयांचे अवैध गौण खनिज जप्त केले आहे.

ठळक मुद्दे१७ लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकही रेतीघाट नसलेल्या बुलडाणा तालुक्यात लगतच्या जालना जिल्हय़ातून मोठय़ा प्रमाणावर  रेतीची चोरटी वाहतूक होत असून, त्याची कुणकुण लागताच महसूल विभागाने तहसीलदार सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात सीमावर्ती भागात दोन गस्ती पथके गेल्या आठ दिवसांपासून तैनात केली असून, आतापर्यंत जवळपास १७ लाख रुपयांचे अवैध गौण खनिज जप्त केले आहे. मंगळवारीही पथकाने एक धडक कारवाई करीत एक टिप्पर ताब्यात घेतले होते. बुलडाणा-जांब, तांदुळवाडीसह तालुक्याच्या सीमावर्ती भागात सात मंडळ अधिकारी आणि तलाठी शासकीय वाहनांचा वापर न करता पाळत ठेवत असून, ही कारवाई करत आहे.बुलडाणा जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्याच्या लगत आहे. मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्‍या खडकपूर्णा नदीमधील रेती ही बांधकामासाठी उत्तम मानल्या जाते. त्यामुळे बुलडाणा, चिखली तालुक्यालगतच्या भागातून बुलडाणा जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक होते. मध्यरात्री दीड ते पहाटे साडेचार-पाच वाजेपर्यंत प्रामुख्याने मोठे टिप्पर ही चोरटी वाहतूक करीत असतात. मुळात बुलडाणा तालुक्यात एकही रेतीघाट नसल्याने बुलडाणा शहरासह लगतच्या पट्टय़ात खडपूर्णाच्या रेतीवरच अनेकांची भिस्त असते. त्यामुळे या रेतीला मागणी आहे. प्रामुख्याने सीमावर्ती भागातून ही रेती बुलडाणा जिल्हय़ात दाखल होते. जाफ्राबाद तालुक्यात ही रेती बुलडाणा तालुक्यात दाखल होते. यातील काहींकडे रायल्टीसंदर्भातील कागदपत्रे असली तरी काहींजवळ ती नसल्याने महसूल विभागाने ही या प्रकरणी धडक कारवाईचा बडगा उचलला आहे.

चोरट्या वाहतुकीची ४४ प्रकरणे उघडलगतच्या जालना जिल्हय़ातून बुलडाणा जिल्हय़ात रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी बुलडाणा तहसीलने ४४ प्रकरणांमध्ये कारवाई करून जवळपास १७ लाख रुपयांचा दंड गेल्या तीन महिन्यात वसूल केला आहे. सोबतच सहा प्रकरणांमध्ये मुरुमाची विनापरवानगी उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणीही दंड ठोठावला गेला आहे. तीन महिन्यात जवळपास ५१ प्रकरणे तहसीलदार सुरेश बगळे यांनी धडक कारवाई करून उघड केली आहे.

महसूल यंत्रणा रात्र गस्तीवरबुलडाणा तहसील अंतर्गत असलेली महसूल यंत्रणा सध्या रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन करणार्‍याविरोधात धडक कारवाई करत आहे. त्यानुषंगाने तहसीलदार सुरेश बगळे आणि नायब तहसीलदार माळी यांची दोन पथके कार्यरत असून, तांदुळवाडी, जांब, सातगाव म्हसला तथा सैलानीलगच्या पट्टय़ात खासगी वाहनाद्वारे महसूलचे हे कर्मचारी पाळत ठेवत आहे. त्यातंर्गतच २६ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एका कारवाईत एक टिप्परही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा