शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:21 IST

बुलडाणा : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्‍यात तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील १७ वर्षांपासून चालू आहे.

ठळक मुद्देनोंदणी करताच मिळणार हजारोंची बक्षिसे व मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्‍यात तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील १७ वर्षांपासून चालू आहे.बुलडाणा जिल्ह्यात यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २0१७ या वर्षी अकोला शहरात बरेचसे कार्यक्रम सखी मंचच्या सदस्यांसाठी घेण्यात आले. यात लावणी, स्पर्धा, सत्कार, कौतुक सोहळे, स्नेहमेळावे, ऋणानुबंध घट्ट करणारे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम, आवडते गिफ्ट या माध्यमातून सखी मंच हा परिवार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरवर्षी हजारो महिला या उपक्रमाचा आणि कार्यक्रमांचा आनंद घेत असतात. दरवर्षी नवनवीन सदस्य या कुटुंबात येऊन सामील होतात. यंदाही या अनोख्या व्यासपीठाची सदस्य नोंदणी बुलडाणा शहरासाठी लवकरच चालू होत आहे. नोंदणी शुल्क ५00 रुपये व जुन्या सदस्यांस ४५0 रुपये आहे (२0१६ चे ओळखपत्र जमा केल्यास) सदस्य नोंदणी करताच वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाची पर्वणी तर मिळणारच आहे; पण त्याशिवाय हजारोंची आकर्षक तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणार्‍या भरपूर सार्‍या भेटवस्तूदेखील मिळणार आहेत.यावर्षीही नोंदणीसाठी शहरातील वेगवेगळ्या विभागातील विभाग प्रमुखांकडे आणि लोकमत कार्यालयात फॉर्म उपलब्ध असणार आहेत. सदस्य नोंदणी केल्यानंतर आकर्षक बक्षिसांमध्ये ६0३ रुपये किमतीचा व्हिज्युअल किचन कॉम्बो सेट तसेच सखी मंच ओळखपत्र, कूपन बुक, वार्षिक भाग्यवंत सोडत या योजनादेखील लागू होणार आहेत. शिवाय, यावर्षी राज्यस्तरीय गोल्डन धमाकामधून भाग्यवंत सखीला एक लाख रुपयापर्यंतचे सोन्याचे दागिने जिंकण्याची संधीदेखील मिळणार आहे. हमखास वस्तू, कूपन्सच्या माध्यमातून प्रत्येक सखीला बरेच बक्षिसे मिळणार आहेत. २0१८ या येत्या वर्षी अनेक बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध स्पर्धा, कार्यशाळा, सांस्कृ तिक, साहित्यिक, कलाविष्कार, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी महिलांनी तत्काळ लोकमत कार्यालय, चोपडा ले-आउट, संगम चौक, बस स्टॅन्डजवळ, बुलडाणा. फोन 0७२६२-२४२६२४ या क्रमांकावर किंवा आपल्या विभागातील सखी मंचच्या विभाग प्रमुखांशी संपर्क साधून जास्तीत जास्त महिलांनी या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

सखी मंच सदस्यता नोंदणी करताच प्रत्येक सखीस हमखास बक्षीस मिळणार

  • - ६0३ रुपये किमतीचा व्हिज्युअल किचन कॉम्बो  सेट.
  • - आकर्षक सखी मंच ओळखपत्र.
  • - राज्यस्तरीय सोडतीद्वारे  गोल्डन धमाका.
टॅग्स :buldhanaबुलडाणा