शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: जि. प. उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:34 IST

जिल्हा परिषदेचे ६० सदस्य असले तरी भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्याची जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ही ५९ आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतही पदासाठी राजकारण तापले असून जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदावरून सध्या तीनही घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, असे असले तरी तुटेपर्यंत ताणायचे नाही ही सामंजस्यपूवर्क भूमिका तिन्ही पक्षांची असल्याने सहा जानेवारी रोजी दुपार पर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती अन्य तीन सभापतीपदे कोणाच्या पारड्यात पडणार हे निश्चित होईल, असे संकेत आहेत.बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक आठ जानेवारी रोजी होत आहे. राज्यात सत्ता समिकरणे बदलल्यानंतरच बुलडाणा जिल्हा परिषदेमधीलही समिकरणे बदलण्याचे संकेत मिळाले होते. मधल्या काळात जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला काही काळ मुदत वाढ मिळाली होती. ही मुदत वाढ २० डिसेंबर २०१९ रोजी संपुष्टात आल्याने आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधरणसाठी (महिला) राखीव आहे. जिल्हा परिषदेचे ६० सदस्य असले तरी भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्याची जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ही ५९ आहे. यामध्ये काँग्रेस १४, शिवसेना ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस नऊ अशी सदस्य संख्या आहे. तर भाजपचे सदस्य २४ आहे.जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देत उपाध्यक्षपद आपल्या पदरात पाडून घेतले होते. आता राज्यातील सत्ता समिकरणे बदलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा दिलेला पाठिंब्याचा टेकू जवळपास काढल्यात जमा आहे. त्यामुळे आठ जानेवारी रोजी महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये येणार असल्याचे जवळपास निश्चीत आहे. सदस्य संख्येचा विचार करता काँग्रेसचे जिल्हा परिषदेमध्ये १४ सदस्य आहे. त्यामुळे आपसूकच काँग्रेसकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद जाणार असल्याचे संकेत आहेत. मात्र उपाध्यक्षपद आपणास मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असल्याने शिवसेना उपाध्यक्षपदावरही दावा सांगत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही जिल्हा परिषद उपाध्यक्षपद हवे आहेत. त्यामुळे या एका मुद्द्यावर आघाडीत अद्याप एक मत झाले नसल्याची चर्चा असून महाविकास आघाडीतील सुत्रांनीही त्यास दुजोरा दिला आहे. मात्र सहा जानेवारीला दुपार पर्र्यंत यावर तोडगा निघणार असलचे सांगण्यात येत आहे. प्रारंभी भाजप सोबत एकत्र येत सत्ते बसत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद उपाध्यक्षपद आपल्या गळ््यात पाडून घेतले होते. मधल्या काळात पदाधिकारी बदालाचे भाजप, राष्ट्रवादीत वारे वाहले होते. लोकसभा निवडणुकीतही या मुद्द्यावर काँग्रेसचा राष्ट्रवादीवर दबाव वाढला होता.त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत उपाध्यक्षपद न देता ते शिवसेनेला द्यावे, अशी भूमिका शिवसेनेची असल्याचे सुत्राचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतंर्गतही काही सदस्यांमध्ये धुसपूस असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद