शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बुलडाणा : आधार दुरूस्तीला १५ अर्जांच्या मर्यादेमुळे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 14:22 IST

बुलडाणा : आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात केवळ १०५ ठिकाणीच आधार कीट देण्यात आलेल्या आहेत.वाढत्या गर्दीमुळे काही आधार कीट चालकांनी टोकन पद्धत सुरू केली आहे. सकाळी १५ जणांना अर्ज देवून त्या १५ जणांचीच कामे दिवसभरात केली जात आहेत.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : आधार कार्ड दुरुस्तीसह आधार संबंधीत विविध कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यात केवळ १०५ ठिकाणी आधार कीट देण्यात आल्या आहेत. आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करीत आपला नंबर येण्याची वाट पहावी लागत आहे.बँकेसह विविध कामांसाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे. परंतू अनेकांच्या आधार कार्डमध्ये नावात बदल, जन्मतारखेत बदल, मोबाईल क्रमांक, पत्ता, ई-मेल आयडी आदी बाबींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. सुरूवातील सेतू केंद्र, महा-ई सेवा केंद्रांसह टपाल कार्यालय, बँका, बीएसएनएल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू होती. परंतू सध्या बहुतांश आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात आले असून काही ठिकाणी आधार केंद्र शोधुनही सापडत नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात केवळ १०५ ठिकाणीच आधार कीट देण्यात आलेल्या आहेत.त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात सात, चिखली १२, देऊळगाव राजा सात, जळगाव जामोद पाच, खामगाव १२, लोणार सात, मलकापूर आठ, मेहकर १२, मोताळा १०, नांदूरा आठ, संग्रामपूर चार, शेगाव पाच आणि सिंदखेड राजा आठ ठिकाणी आधार कीट आहेत. सध्या आधार दुरूस्ती, बायोमेट्रीक नोंदी, मोबाईल क्रमांक टाकणे यासारखे कामे वाढलेले असताना जिल्ह्यात आधार किटची कमतरता जाणवत आहे.वाढत्या गर्दीमुळे काही आधार कीट चालकांनी टोकन पद्धत सुरू केली आहे. सकाळी १५ जणांना अर्ज देवून त्या १५ जणांचीच कामे दिवसभरात केली जात आहेत. तसेच आधार डाटा पाठविण्याचे सांगूण सायंकाळी ४ वाजेनंतर आधार नोंदणी किंवा दुरूस्तीचे काम करण्यास नकार दिला जातो. त्याचबरोबर सर्व्हरबाबत तांत्रिक अडचणीमुळे होणारा विलंब, हाताचे ठसे व डोळ्याचे स्कॅनिंग होत नसल्यामुळे अडचणी येत आहे. आधारची संगणकीकृत माहिती (डेटा) साठवून ठेवण्यासाठी असलेल्या मुख्य सर्व्हर बंद पडत असल्यामुळे आधार नोंदणीच्या अधिकृत केंद्रावर गर्दी वाढत आहे. प्रकरणी ही मर्यादा वाढून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी ओरड आहे.आधार दुरूस्तीसाठी केंद्रावर चकराजिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार केंद्र चालकांना आधार केंद्रावर १५ अर्जाची कुठलीही मर्यादा देण्यात आलेली नाही; तसेच ४ वाजेपर्यंतच आधारची कामे करावी, असे वेळेचे बंधन सुद्धा घालण्यात आलेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र तरीसुद्धा आधार केंद्र चालकांकडून केवळ १५ अर्ज व ४ वाजेपर्यंतच काम होईल अशा वेगवेगळ्या अटी ठेवण्यात येत असल्याने आधार दुरूस्तीसाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.

बुलडाण्यात केवळ एक कीटआधार नोंदणी किंवा दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत जिल्ह्यात १०५ कीट देण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश कीट बंद अवस्थेत आहेत. बुलडाणा तालुक्यात चांडोळ, बुलडाणा, धामणगाव, म्हसला बु., तराळखेड, शिरपूर, भडगाव या सात ठिकाणी आधार कीट देण्यात आल्या आहेत. परंतू लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या बुलडाणा शहरात आधारसाठी केवळ एक कीट जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत देण्यात आली असून, या एका केंद्रावर अनेक अडचणी येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAdhar Cardआधार कार्ड