शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा :  सार्वजनिक समितीकडून शिवजयंती उत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:33 IST

बुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा  मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी तसेच शिवभक्तांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा  मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, युवक, विद्यार्थी तसेच शिवभक्तांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात गुरुवारी पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, सचिव सुनील सपकाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, १७ फेब्रुवारी  रोजी सायंकाळी गांधी भवनामध्ये प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होईल. १८ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय शाहीर प्रसाद विभुते यांचा शाहिरी लोककलेचा कार्यक्रम व १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजतापासून जिजामाता स्टेडियममध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच दुपारी ३ वाजता संगम चौकातून शोभायात्रा निघेल. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तीनही दिवसांच्या कार्यक्रमांना  उपस्थित राहून नागरिकांनी शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, तथा हा उत्सव लोकोत्सव करावा, असे आवाहन समिती अध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबरहंडे सुनील सपकाळ, प्रा. डॉ. अनंत शिरसाट, प्रा. सदानंद माळी, राजेश हेलगे, प्रवर्तक रणजितसिंग राजपूत, सुरेश देवकर, राहुल सपकाळ यांनी केले. यावेळी माजी आ. विजयराज शिंदे, जि. प. सदस्य  जयश्री शेळके, बारा बलुतेदार संघाचे राज्य उपाध्यक्ष दामोधर बिडवे, शाहिना पठाण आदी उपस्थित होते.

शहर स्वच्छता मोहीम राबविणार!यावर्षी उत्सव समितीने संपूर्ण बुलडाणा शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणावरून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात येईल. मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन, बुलडाणा अर्बन परिवार यांचे सहकार्य लाभणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज