शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा पोलिसांच्या सतर्कमुळे वाचले चिमुकल्यासह महिलेचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:00 IST

बुलडाणा: क्षुल्लक कारणावरून घरच्यांशी भांडण झाल्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या मायलेकांना बुलडाणा पोलिसांनी जीवदान दिले.

ठळक मुद्देघरच्यांशी वाद झाल्यामुळे गुरूवारी रात्री ११ वाजता एक महिलेने चिमुकल्यासोबत घर सोडले.घरच्यांशी भांडण झाल्यामुळे आत्महत्येच्या विचाराने बाहेर पडल्याचे तिने पोलिसांना सांगितले.पोलिसांनी तिच्या माहेरचा पत्ता विचारून तिला चिमुकल्यासह माहेरी सुखरूप पोहचविले.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा: क्षुल्लक कारणावरून घरच्यांशी भांडण झाल्याने आत्महत्या करण्यास निघालेल्या मायलेकांना बुलडाणा पोलिसांनी जीवदान दिले. पोलिसांच्या सतर्कमुळे एका चिमुकल्यासोबतच महिलेचेही प्राण वाचले. त्यामुळे पोलिसांच्या सहृदयतेबाबत समाजमनात चांगल्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

घरच्यांशी वाद झाल्यामुळे गुरूवारी रात्री ११ वाजता एक महिलेने चिमुकल्यासोबत घर सोडले. शहरातील एका हॉस्पीटल समोरील तलावावर ही महिला पोहोचली. तितक्यात चिमुकले बाळ रडत असल्याने ती खाली बसली. बाळाला दूध पाजत असताना स्वत:ही हुंदके देत होती. तेवढ्यात एएसआय मधुकर मैंद, एनपीसी भागवत कºहाळे,  पोका शांताराम घुये रात्रीच्या गस्तीदरम्यान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, घरच्यांशी भांडण झाल्यामुळे आत्महत्येच्या विचाराने बाहेर पडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. तिच्या माहेरचा पत्ता विचारून तिला चिमुकल्यासह माहेरी सुखरूप पोहचविले.  पोलिसांच्या सतर्कतेमुळे मायलेकांचा जीव वाचल्याची चर्चा आहे. 

 

पोलिसांकडून महिलेचे समुपदेशन!

क्षुल्लक वादातून टोकाचा निर्णय घेऊ नको. घरच्यांच्या भांडणात तुझा आणि चिमुकल्याचा नाहक जीव जाईल. शांत डोक्याने विचार कर, असा सल्ला देत पोलिसांनी तसेच पोलिस निरिक्षक यु.के. जाधव यांनी सदर महिलेचे समुपदेशन केले. 

घरच्यांशी भांडण झाल्याने आत्महत्येच्या बेताने द्विधा मन:स्थितीत निघालेल्या एका महिला पोलिसांना रात्रीच्या गस्ती दरम्यान आढळून आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेसह चिमुकल्याचे प्राण वाचले. महिलेला तिच्या माहेरी पोहोचविण्यात आले.

- यु.के. जाधव,पोलिस निरिक्षक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस