शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

बुलडाणा: अवाजवी कर आकारणी विरोधात आक्षेप मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:44 IST

जळगाव जामोद(बुलडाणा) : नगरपालिकेने अवाजवी कर लादल्याचा आरोप करीत हा कर कमी करण्याच्या मागणीसाठी ९ मार्च रोजी नगर परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी जळगाव शहर व तालुक्याच्यावतीने आक्षेप मोर्चा काढण्यात आला. याशिवाय भारिप -बहुजन महासंघाच्यावतीने घंटानाद करण्यात आला. 

ठळक मुद्दे नागरिकांसह भारिप-काँग्रेसचा नगरपालिकेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद(बुलडाणा) : नगरपालिकेने अवाजवी कर लादल्याचा आरोप करीत हा कर कमी करण्याच्या मागणीसाठी ९ मार्च रोजी नगर परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी जळगाव शहर व तालुक्याच्यावतीने आक्षेप मोर्चा काढण्यात आला. याशिवाय भारिप -बहुजन महासंघाच्यावतीने घंटानाद करण्यात आला. नगर परिषदेने प्रस्तावित कर २०१८-१९ साठी अवाजवी कर लादून शहरातील जनतेवर जुलमी अन्याय केला आहे. त्यामुळे जळगाव शहरात जनतेमध्ये प्रक्षोभ उफाळला आहे. सदर मालमत्ता करवाढ विरोधात भा.राष्ट्रीय काँग्रेसने भव्य मोर्चा नगर परिषदेवर नेला. त्यामध्ये शहरातील सर्व समाजस्तरावरील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी मुख्याधिकारी यांना निवेदन व ११७ आक्षेप अर्ज देण्यात आले व मुख्याधिकारी यांच्यावतीने शहरातील सर्व नागरिकांचे आक्षेप अर्ज स्वीकारण्याची माहिती बडे बाबू डोंगरे यांच्याकडून उपस्थितांना देण्यात आली, तसेच मोर्चा यशस्वी करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, ता.अध्यक्ष अविनाश उमरकर, काँग्रेस नेते खालीकबापू देशमुख, रमेशचंद्र घोलप, डॉ. स्वाती वाकेकर, प्रसेनजित पाटील, प्रकाश पाटील, राजू पाटील, युनूसखान, ज्योती ढोकणे,  लता तायडे, उर्मिला पलन, परवीन देशमुख, नगरसेवक श्रीकृष्ण केदार, नितीन ढगे, चित्रा इंगळे, कुंती पाटील, कलीमखा हुसेनखा, अ‍ॅड.संदीप मानकर, राजेंद्र वानखडे, मोहन जयस्वाल, राजू घुटे, अमर पाचपोर, प्रवीण भोपळे, शाकिरखान, मिलींद वानखडे, प्रदीप खांदे, इरफान शेट्टी, महेंद्र बोडखे, कैलास पाटील, विठ्ठल दातीर, समू जागिरदार, बाळू चव्हाण, बाळु इंगळे, फकिरा लिडर, सरफराज घोडेवाले, संजय जाधव, मुस्ताक देशमुख, गुलजारखा पठाण, संजय देशमुख, किसन कतोरे, सुनील मिसाळ, राजू घुळे, सै.अफरोज, अजय ताठे, जुबेर पटेल तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी, नागरिक, बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारिप-बमसंचा घंटानादजळगाव जामोद : स्थानिय न.प.ने शहरातील घरांचा विशेष सर्व्हे करून आकारलेल्या प्रचंड कराविरोधात शहर भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने ९ मार्च रोजी न.प.समोर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहर अध्यक्ष रियाज अहेमद ऊर्फ राजूभय्या व युवा ता.अ. सुनील बोदडे यांच्या नेतृत्वात सदर घंटानाद करण्यात आले. या करवाढीमुळे सामान्य माणसांची कंबरच मोडली आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून लोकांनी कोणतेच नवीन बांधकाम केलेले नाही. न.प.ने जनतेच्या आर्थिकी परिस्थितीचा विचार न करता अवाजवी, जुलमी करवाढ केली आहे, तसेच शहरातील गरीब लोक केवळ मालकीची जागा नाही म्हणून घरकुल योजनेपासून वंचित राहिली. अतिक्रमीत जागेवर घरकुल देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली असून, आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाची मागणी केली आहे. वरील मागणीचे निवेदन न.प. मुख्याधिकारी यांना दिले असून, या निवेदनावर रियाज अहेमद, सुनील बोदडे यांच्यासह युवा जिल्हा अध्यक्ष चेतन घिवे, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर दाभाडे, अरुण पारवे, माजी ता.अ. बाबूराम तायडे, विजय पारवे, प्रभाकर तिजारे, पार्वता इंगळे, देवानंद दामोदर, अताउल्लाखा, हरामतउल्लाखा, रतन नाईक, इज्जतबेग, तनदीर जमदार, शेख नासीर, संजय इंगळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. करवाढ रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. या घंटानाद आंदोलनाला भारिप-बमसंचे ज्येष्ठ नेते वसुलकर काका यांनी भेट देऊन करवाढीचा निषेध केला.                              

टॅग्स :buldhanaबुलडाणा