शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बुलडाणा :  नऊ हजार नागरिकांना स्वगृही परतण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:13 PM

स्वगृही परत जाऊ इच्छिणाºया नऊ हजार ५८७ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने परवागनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत दोन महिन्याच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखांच्या आसपास नागरिक परजिल्ह्यातून तथा राज्यातून स्वगृही परतले आहेत. दरम्यान, जिल्हास्तरावरून महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातून तथा पाच राज्यातून स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तथा स्वगृही परत जाऊ इच्छिणाºया नऊ हजार ५८७ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने परवागनी दिली आहे.यातील बºयाच व्यक्ती स्वगृही परतल्या असून प्रत्यक्षात किती जण घरी पोहोचले आहेत, याचा आढावाही सध्या जिल्हा प्रशासन घेत आहेत. महाराष्ट्रातील २५ पेक्षा अधिक जिल्ह्यातून तब्बल चार हजार २८७ नागरिक बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले असून यात ६८७ उसतोड मजुरांचा समावेश आहे. तर कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेल्या एकट्या पुणे जिल्ह्यातून एक हजार ६७९ नागरिकांना बुलडाणा जिल्ह्यात स्वगृही परतण्यास परवानगी देणत आली आहे. रेड झोनमधील जळगाव खांदेश जिल्ह्यातून ५७१, कोल्पापूरमधून १०८, नंदूरबारमधून २७, वर्ध्यातून ४२, लातूरमधून १६२, नाशिक मधून ५८, जालन्यातून ६७,धुळे जिल्ह्यातून १००, भंडाºयातून ३७, अकोल्यातून सात, नागपूरमधून १४८, औरंगाबादमधून १२७, सोलापूरमधून ९५ तर यवतमाळ जिल्ह्यातून ५४, गडचिरोलीतून चार, नांदेडमधून ६५ या प्रमाणे नागरिकांना बुलडाणा जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यता आली आहे.दुसरीकडे शासनस्तरावरून ही परवानगी देण्यात आली असली तरी अनधिकृतस्तरावरही बरेच नागरिक जिल्ह्यात स्वगृही परतले असून त्यांच्यामुळे आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाचा उद्रेक बुलडाणा जिल्ह्यात नियंत्रित होता. मात्र आता त्याची व्याप्ती वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातही पुण्या, मुंबईतून मजूर गावी परत येत आहेत. अलिकडील काळात सापडलेले पाच रुग्ण हेही अशाच महानगरातून आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता एक प्रकारे समुह संक्रमणाचा धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त होत आहे. गुजरातमधील ५,११० जणांना परवानगी गुजरात राज्यातून बुलडाण्यात येण्यासाठी पाच हजार ११० जणांना परवानगी देण्यात आली आहे. हिमाचलमधील २३ जण पूर्वीच परतले असून राजस्थानमधील ८४ जणांनीही घर गाठले आहे. दिल्लीतील ४४ जणापैकी बरेच जण परतेले आहेत. सध्या दररोज जवळपास दीड हजार नागरिकांना परवानगी देण्यात येत असून पुण्या, मुंबईत जावून परत येण्यसाठी परवानगी मागणाऱ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. सकाळ पासून सायंकाळपर्यंत सध्या परवानगी देण्याचे काम सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा