शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बुलडाणा पालिकेला स्वच्छतेचा ध्यास; अभियानात अग्रेसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:14 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील पोटेंशियल सिटी म्हणून  निवड झालेल्या बुलडाणा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम २५ शहरामध्ये  येण्यासाठी शहर हगणदरीमुक्त करण्यासह स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विविध उ पक्रम राबविणे सुरू केले असून, स्वच्छ भारत अभियानाचा ध्यास घेतला आहे.  

ठळक मुद्देविविध उपक्रमांची अंमलबजावणी

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील पोटेंशियल सिटी म्हणून  निवड झालेल्या बुलडाणा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम २५ शहरामध्ये  येण्यासाठी शहर हगणदरीमुक्त करण्यासह स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विविध उ पक्रम राबविणे सुरू केले असून, स्वच्छ भारत अभियानाचा ध्यास घेतला आहे.  त्यामुळे येणार्‍या काळात अभियानाला वेग येऊन बुलडाणा पालिका देशपातळीवर  झळकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ भारत अभियानासाठी  पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. त्यातील २५ शहरांची ‘स्वच्छ शहर, सुंदर  शहर’ म्हणून निवड करण्यात येऊन त्या शहरांना केंद्र शासनाचा प्रत्येकी ५ कोटींचा  निधी देण्यात येईल. या अभियानासाठी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद,  शेगाव, बुलडाणा व लोणार या चार शहरांचा समावेश आहे. या अभियानात राष्ट्रीय  स्तरावर झळकण्यासाठी बुलडाणा नगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यास  सुरुवात करण्यात आली असून, अभियानाने आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे.  बुलडाणा पालिकेतर्फे हगणदरीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, पालिकेतर्फे  नियुक्त पथक उघड्यावर शौचास बसणार्‍यावर कारवाई करीत आहे. तसेच याबाब त शहर परिसरात जनजागृती करण्यात येऊन शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त केले  जात आहे. शौचालय बांधकामाचे ३ हजार २00 उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्या पैकी आतापर्यंत २ हजार ५00 शौचालये बांधण्यात आले आहेत. स्वच्छता दूताची  नियुक्ती करण्यात आली असून, शहर परिसरात जनजागृती करण्यात येत आहे.  पालिकेच्या जवळपास १0 शाळेत स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली असून  विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. शहर परिसरातील ४  पेट्रोल पंपासह इतर पेट्रोल पंपावरील शौचालय नागरिकांसाठी खुले करून देण्यात  आले आहे. यापूूढे शहरातील हॉटेल व व्यापारी संकुलातील शौचालये  नागरिकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय शासनाने अनिवार्य केलेली ई-लर्निग प्रणाली पालिकेतील प्रत्येक  कर्मचार्‍यांनी पास केली असून, त्याचा उपयोग अभियानाच्या जनजागृतीसाठी  करण्यात येणार आहे. गृहनिर्माण संख्या, धार्मिक नेते, स्वयंसेवकांना मार्गदर्शन  करून त्यांना अभियानात सहभागी करून घेण्यात येणार असून व्यापारी क्षेत्र तसेच  बसस्थानक परिसरातील दुकानात कचरा पेट्या ठेवण्यात येणार असून, येणार्‍या  काळात शहरातील सफाई काम दिवसातून दोन वेळा करण्यात येणार आहे. शहरात  ५00 मीटर अंतरार कचरा कुड्या ठेवण्यात येणार आहे. याबाबत पालिकेत  जनजागृतीसाठी कार्यक्रम अंमलबजाणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

तक्रार निवारण्यासाठी स्वच्छता अँप कार्यान्वितअभियानात येणार्‍या अडचणी व तक्रारी नोंदणीसाठी प्रशासनातर्फे स्वच्छता अँप  निर्माण करण्यात येत आहे. या अँपवर शहरातील व्यक्ती आपल्याला येणार्‍या  अडचणींची तक्रार फोटोसह करता येईल. त्याची दखल घेत २४ तासात तक्रारीचे  निराकरण केले जाईल. याशिवाय तक्रारीचा पाठपुरावा किंवा तक्रार निवारण  झाल्याचा अभिप्राय नोंदणी करता येईल.

उद्यान सुशोभीकरणासह गांडूळ खत प्रकल्पविविध समस्या व अतिक्रमामुळे शहर परिसरातील उद्याने भकास झाली होती; मात्र  स्वच्छ भारत अभियानामुळे या उद्यानांना नवीन झळाळी मिळणार आहे. त्या दृष्टीने  प्रयत्न होत आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध होईल.  उद्यानातील पाला-पाचोळा गोळा करून उद्यान परिरात गांडूळ खत प्रकल्पाची निर्मि ती करण्यात येत आहे. याशिवाय डोअर टू डोअर ओला, सुखा कचरा गोळा करून  वर्गीकरण करीत खत निर्मितीला प्राधान्य दिले जाईल.

या अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम घरा तील कचर्‍याचे ओला, सुका असे वर्गीकरण करून येणार्‍या घंटागाडीकडे दररोज  देणे आवश्यक आहे. याशिवाय आपल्या परिसरातील स्वच्छतेच्या समस्या  सोडविण्यासाठी स्वच्छता अँपचा लाभ घ्यावा.-करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी, न.प. बुलडाणा.

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सीMuncipal Corporationनगर पालिका