शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 11:34 IST

Buldhana News मास्क न लावणाऱ्यांना तथा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी बुलडाणा पालिकेने विनामास्क फिरणाऱ्या तथा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करून अवाजवी गर्दी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा शहरात पाच पथके गठित करण्यात आली आहे. स्टेट बँक चौक, चिखली रोडसह शहरातील विविध भागात फिरून ही पथके मास्क न लावणाऱ्यांना तथा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. दरम्यान पालिकेच्या या धडक कारवाई मोहिमेमुळे घरात अडगळीत गेलेले अनेकांचे मास्क आता पुन्हा तोंडावर आले आहेत. तसेच नागरिकही शारीरिक अंतराचे योग्य पद्धतीने पालन करत असल्याचे चित्र तूर्तास तरी आहे. बाजारपेठेमध्येही तुलनेने गर्दी कमी झाली आहे. बुलडाणा पालिकने १८ फेब्रुवारी पासूनच पथके गठित करून कारवाई सुरू केली आहे. स्वत: जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी करून ही पथके योग्य पद्धतीने काम करत आहेत का नाही, याची चाचपणी केली होती. त्यानुषंगाने ही पथकेही अधिक सक्रिय झाली आहेत.  प्रकाश केसकर, शुभम मेश्राम, गजानन बदरखे, आशिष फोकाटे, राजेश भालेराव हे प्रमुख असलेल्या या पथकात प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पाचही पथकांना त्यांचा परिसर ठरवून दिलेला आहे. पहिले पथक मलकापूर रोड, डॉल्फिन स्विमिंग पूल ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक मुख्यालय,  दुसऱ्याकडे जांभरून रोड, बस स्टँड परिसर ते संगम चौक, तिसऱ्या पथकाकडे चिखली रोड, बोथा खामगाव रोड ,  त्रिशरण चौक, चौथ्या पथकाकडे चिंचोले चौक, धाड रोड, नाका ते सर्क्युलर रोड आणि अतिक्रमण पथकाकडे जनता चौक, बाजारपेठ, मार्केट लाईन ते कारंजा चौक असा भाग देण्यात आला आहे. प्रसाशन अधिकारी संजय जाधव  व  एकनाथ गोरे यांच्यावर या पथकांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

साडेसात लाखांचा दंड वसूलबुलडाणा शहरात गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत बुलडाणा पालिकेने सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात मास्क न लावल्याप्रकरणी २ लाख ९ हजार रुपये, वेळेनंतर दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपये, रस्त्यावर तथा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी १ लाख ५७ हजार रुपये, शारीरिक अंतराचे पालन न केल्या प्रकरणी १ लाख २६ हजार आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक