शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:51 IST

Buldana municipal Counsil पालिका मुख्याधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  पालिका कर्मचाऱ्यास विकास देयकाच्या कारणावरून शिवीगाळ केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी १० फेब्रुवारी रोजी दिवसभर कामबंद आंदोलन केले. दरम्यान, दुपारी पालिका मुख्याधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. ९ फेब्रुवारी हा प्रकार घडला होता. नगराध्यक्ष पती मोहम्मद सज्जाद यांनी विकास कामांच्या देयकावरून पालिकेतील कर्मचारी अमोल जीवनसिंग इंगले यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काही नगरसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थी करत, हे प्रकरण आपसात मिटविल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर आणखी काही घटामोडी होऊन या प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांनी १० फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलन करत, पालिकेच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून हे कामबंद आंदोलन सुरू होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पालिका कर्मचारी काहीसे आक्रमक झाले होते. त्यानंतर, नगराध्यक्षा नजुमोन्नीसा मोहम्मद सज्जाद व  पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर, उभय बाजूत समझोता होऊन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामध्ये पालिका कर्मचारी संघटनेचे जगदेव कार्ले, गणेश मुळे, गजेंद्र राजपूत, गजानन चिंचोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल लघाने यांच्यासह अन्य पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन