शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा:  न्युमोनिया झालेल्या ६८ बकऱ्यांचे मॉनिटरींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:29 IST

आजारी बकऱ्यांना अन्य बकऱ्यांपासून वेगळे ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाच्या चमुने दिला आहे.

ठळक मुद्दे काही दिवस बकऱ्यांना ठेवावे लागणार विलगरक्तजल व स्वॅब नमुने उपायुक्त कार्यालयात.

बुलडाणा: जळगाव जामोद तालुक्यातील चाळीस टपरी आदीवासी पाड्यावरील आजारी बकऱ्यांची जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तपासणी केली असून त्यांचे स्वॅब नमुने, रक्त जल नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांसाठी या आजारी बकऱ्यांना अन्य बकऱ्यांपासून वेगळे ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाच्या चमुने दिला आहे. या आदिवासी पाड्यातील ६८ बकऱ्यांपैकी एका बकरीचा मृत्यू झाला असून आठ बकऱ्यांमध्ये कॅथॅजिअस, कॅप्सीन फ्ल्यूरोनिमोनिया अर्थात उन्हाळी सर्दीची लक्षणे आढळून आली आहेत. २० आणि २१ एप्रिल दरम्यान या बकºयांवर उपचारही करण्यात आले असून त्यांच्यामध्ये सुधारणा होत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.  पी. जी. बोरकर यांनी सांगितले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये बकºयांना न्युमोनिया सदृश्य आजार झाल्यामुळे आदिवासींमध्ये घबराट निर्माण झाली होती. यासंदर्भात बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून या भागातील पशुधनाची तापसणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार २० व २१ एप्रिल रोजी डॉ. तळेकर आणि सहाय्यक आयुक्त डॉ. जयसवाल यांच्या नेतृत्वात पशुसंवर्धन विभागाच्या चमुने चाळीस टपरी पाड्यावरील ६८ बकºयांची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये आठ बकºयांमध्ये सीसीपीपी अर्थात कॅथॅजिअस, कॅप्सीन फ्ल्यूरोनिमोनियाची लक्षणे आढळून आली. दोन दिवस उपचार केल्यांतर या बकºयांना असलेला ताप सर्वसाधारण असल्याचे तपासणीत समोर आले. दरम्यान, एका बकरीचा मृत्यू झाला आहे.

संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण

या बकºयांना झालेला उन्हाळी सर्दीचा हा संसर्ग अन्य बकºयांना होऊ नये म्हणून त्या तीन दिवस वेगळ््या बांधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सोबतच गोठ्यामध्ये हवा खेळती राहील, अशा पद्धतीने व्यवस्था करावी, आजारी बकºयांना सकस आहार द्यावा, स्वच्छ पाणी पाजावे, जंतू निर्मूलन करावे, अशा सुचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

तीन दिवस पथक गावातच

या बकºयांचे मॉनिटरींग करून तपासणी करण्यासाठी तीन दिवस पशुसंवर्धन विभागाचे पथक या आदीवासी पाड्यावरच राहणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. सोबतच बकºयांवर उपचार सुरू असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोद