शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्यासाठी बुलडाण्यातील प्रयोग शाळेस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:33 IST

कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी दीड  कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे

बुलडाणा: कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यासाठी होणारा विलंब पाहता बुलडाणा जिल्ह्यातच कोरोना तपासणीसाठी प्रयोग शाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी दीड  कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. या प्रयोग शाळेमध्ये दहा कर्मचाºयांची अवश्यकता असून लवकरच ही प्रयोगशाळा बुलडाण्यात सुरू होणार आहे.ही प्रयोग शाळा उभारण्यासाठी येणारा दीड कोटी रुपयांचा खर्च एनआरएचएममधून करण्यात येणार असून हा निधीही त्वरित देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी व काही निवडक अधिकाºयांची बैठक घेवून याबाबत माहिती दिली. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी बुलडाण्यात लवकरच ही प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट  केले.जिल्ह्या लगतच्या अकोला, जळगाव खान्देश, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात कोराना संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील चाचण्यांची संख्या वाढली असून त्यात बुलडाणा जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्याची भर पडल्याने या प्रयोगशाळांवर दबाव वाढला होता. बुलडाण्यातून अकोला, यवतमाळ आणि नागपूर येथे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यामुळे त्याचे अहवाल येण्यास विलंब लागत होता. त्या दरम्यान, संदिग्ध रुग्ण, त्याच्या कुटुंबियांची स्थिती आणि यंत्रणेचा जाणारा वेळे यामुळे एक प्रकारचा तणाव प्रशासकीय पातळीसह संदिग्ध रुग्णांच्या कौटुंबिकस्तरावर येत होता. त्यामुळे बुलडाण्यातही कोरोना तपासणीसाठी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यातील लगतच्या जिल्ह्यात वाढलेला संसर्ग पाहता जिल्हयातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी व निदान लवकरच होण्यासाठी ही लॅब सुरू करण्यात येणार आहे.आगामी काळात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचे रिपोर्ट त्वरित मिळणे अपेक्षीत आहे. त्यादृष्टीकोणातून ही भूमिका घेण्यात आली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या