शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: खामगावात कुटुंबाला झोपेत पेटविण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:23 IST

खामगाव(बुलडाणा): स्थानिक रेखा प्लॉट भागातील एका कुटुंबाला पेटविण्याचा प्रयत्न उशिरा रात्री शहरात घडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आगीची आस लागून जाग आल्याने पुढील अनर्थ टळला.

ठळक मुद्देरेखा प्लॉट भागातील घटना पेट्रोल टाकून घर जाळले!

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव(बुलडाणा): स्थानिक रेखा प्लॉट भागातील एका कुटुंबाला पेटविण्याचा प्रयत्न उशिरा रात्री शहरात घडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आगीची आस लागून जाग आल्याने पुढील अनर्थ टळला.रेखा प्लॉट भागातील तुषार तुकाराम वखरे (३६) आपल्या कुटुंबीयांसोबत झोपले होते. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा लावून कुलूप लावण्यात आले. त्यानंतर घरावर पेट्रोल टाकून त्यांचे घर जाळण्यात आले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हा खोडसाळपणा केला असून, आगीत वखरे यांच्या घराच्या दरवाज्यासह घरातील लाकडी पलंग जळाला आहे. यामुळे वखरे यांचे तीन ते साडेतीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घर पेटविले त्यावेळी घरात तुषार वखरे यांच्यासह त्यांची पत्नी आणि अनुष्का व अनुज ही दोन मुले होती. या प्रकरणी वखरे यांनी शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

रेखा प्लॉट परिसरात दहशत!

काही दिवसांपूर्वी याच परिसरात वाहने पेटविण्यात आली होती. त्यानंतर आता परिसरात घर पेटविण्यात आले. त्यामुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात दहशतीचे वातावरण असून, नागरिक भयभीत झाले आहेत. दोन गटाकडून नेहमीच काही नागरिक पिचल्या जात असून, दहशत निर्माण करण्याच्या उद्देशातूनच शनिवारचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार चौकशीवर ठेवली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा