शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जनता कर्फ्यू : दुकाने बंद; जनता रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 11:32 IST

बुलडाणा, लोणार, खामगावसह जिल्ह्यातील बहुतांश भागात असेच चित्र दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सहा हजारांच्या घरात पोहचत असतानाच संक्रमणाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. त्यास जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. एकीडे दुकाने बंद होती तर लोक मात्र रस्त्यावर सर्रास फिरत असल्याचे चित्र दिसून आहे.बुलडाणा, लोणार, खामगावसह जिल्ह्यातील बहुतांश भागात असेच चित्र दिसून आले. त्यातच जनता कर्फ्यु रद्द झाल्याच्या अफवा दोन दिवसापासून जिल्ह्यात सोशल मिडीयावर फिरत होत्या. त्याचाही विपरीत परिणाम जनता कर्फ्युच्या करण्यात आलेल्या आवाहनावर झाला.दुसरीकडे मात्र रस्त्यावर अकारण फिरणाऱ्या तथा मास्कचा वापर न करणाºया अनेकांवर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. त्याचा येत्या काळात नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा नऊ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आयसीएमआरने व्यक्त केली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचीही संख्या जवळपास १७८ च्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकट्या आॅगस्ट महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली होती तर वर्तमान स्थितीत कधी दीडशे तर कधी दोनशे कोरोना बाधीत व्यक्ती आढळून येत होते. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून तथा व्यापाºयांकडून प्राप्त झालेल्या सुचनांचा आधार घेत जिल्हत जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १५ सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सुचनांच्या आधारावर जिल्ह्यात जनता कर्फ्यु १८ ते २ आॅक्टोबर दरम्यान राहण्याचे संकेत दिले होते. त्यानुषंगाने हा जनता कर्फ्यु सध्या पुकारण्यात आला आहे. यामध्ये जिवनावश्यक वस्तू, किरणा दुकान, रुग्णालय, मेडीकल स्टोअर्स, दुधाला सुट देण्यात आलीआहे. बुलडाण्यात सकाळी फारसी गंभीरता नव्हती मात्र दुपानंतर प्रत्यक्ष जनता कर्फ्युला प्रतिसाद मिळू लागला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक