शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: बेकायदा गर्भपात; एकास गुजरातेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:59 IST

मोताळा(बुलडाणा): बेकायदा गर्भपात आणि लिंग निदान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुजरामधील सुरत येथून या प्रकरणातील एका मध्यस्थास अटक केली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर येथील प्रकरणात त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन स्पष्ट झाले आहे. 

ठळक मुद्देसंशयित डॉक्टर आरोग्य यंत्रणेच्या ‘रडार’वर

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा(बुलडाणा): बेकायदा गर्भपात आणि लिंग निदान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुजरामधील सुरत येथून या प्रकरणातील एका मध्यस्थास अटक केली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर येथील प्रकरणात त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन स्पष्ट झाले आहे. परिणामी या प्रकरणात आता आरोपींची संख्या पाच झाली असून, आणखी काही आरोपी या प्रकरणात वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अभिषेक ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थाचे नाव आहे. त्याला मोताळा न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवाजी बोर्डे, पोलीस कॉन्स्टेबल नरेश रेड्डी, दामोदर लठाड यांनी त्यास सुरत येथून ताब्यात घेतले. ३२ वर्षीय अभिषेक सुरतमध्ये विष्णू नगरात राहत होता. त्याच्या घरातून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरातमधील पांडेसरा पोलिसांचे या कामी बोराखेडी पोलिसांना सहकार्य मिळाले. शुक्रवारी रात्री त्यास बोराखेडी येथे आणण्यात आले. दरम्यान, प्रभारी ठाणेदार दीपक वळवी यांनी शनिवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.     बीड जिल्ह्यातील २४ वर्षीय विवाहितेचे गुजरात राज्यात गर्भलिंग निदान करण्यात आले होते. गर्भपातासाठी तिला कुटुंबीयांनी मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील ब्रीजलाल सुपडा चव्हाण याच्याशी संपर्क साधला होता. कोणतीही वैद्यकीय अर्हता नसलेल्या ब्रीजलाल चव्हाण याने राजूर येथे सदर विवाहितेचा अवैधरीत्या गर्भपात करताना, तिची प्रकृती बिघडल्याने तिला बुलडाण्यातील डॉ. सय्यद आबिद हुसेनकडे नेण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला अकोला हलविण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले होते. प्रकरणी मोताळा येथील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. डिसेंबर २०१७ मध्ये प्रकरणात ब्रीजलाल सुपडा चव्हाण (५० रा. गुळभेली, ता. मोताळा), डॉ. सैय्यद आबिद हुसेन सय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा), गर्भपात करून घेणारी २४ वर्षीय विवाहिता व तिचा पती किशोर सुदामराव चाळक (२९, रा. किनगाव, ता. गेवराई, जि. बीड) या चौघांना  अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांना जामीन न मिळाल्यामुळे जवळपास ते अडीच महिन्यांपासून तुरुंगातच असल्याची माहिती आहे, तर डोणगाव येथेही दत्तात्रय रुग्णालाच्या दोन सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा