शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा, चिखलीत वाढीव विद्युत देयकांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:38 IST

महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या-सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली.लॉकडाऊन काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजिबले देण्यात आले आहे. राज्यभरात वीजिबलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, १३ जूलै रोजी रविकांत तुपकर यांचे नेतृत्वात बुलडाण्यात वीजबिलांची होळी करण्यात आली. महावितरणच्याप्रवेश द्वारासमोर प्रचंड नारेबाजी करत वीजबिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला. त्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्या मार्फत उर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिक्षक अभियंता यांना वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र संतापाची कल्पना दिली.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. एप्रिल महिन्यापासून ५ ते १५ टक्के बिलामध्ये वाढ झालेली आहे. एकूण तीन महिन्याचे युनिट बिलामध्ये समाविष्ठ झाल्याने जादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व लघुव्यवसाय बंद होते. अनेकांचे दुकाने बंद असतानाही त्यांना वाढीव बिले आली आहेत. लॉकडाऊन काळातील विद्युत देयके माफ करण्याची मागणी करण्यात आली.

चिखली तहसिलसमोर आंदोलनचिखली: स्थानिक तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विजबिलांची होळी करु न आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीने घरगुती व लघु व्यावसायिकांच्या वीज बिलांमध्ये दरवाढ केली. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ही वीज बिले भरणे शक्य नाही. वीज बिल माफ करण्यात यावी या मागणीसंदर्भाने यावेळी नारेबाजी देखील करण्यात आली. तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. बिले माफ केली नाही तर महावितरणचे कार्यालयही जाळू, असा गंभीर इशाराही देण्यात आला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण