शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:32 IST

बुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेडसह १२ गावाचे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक कडाळे यांना शुक्रवारी घेराव घातला. यावेळी चर्चेअंती चालू बिल भरून बारा गाव पाणी पुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देविजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेड परिसरातील ग्रामस्थांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेडसह १२ गावाचे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक कडाळे यांना शुक्रवारी घेराव घातला. यावेळी चर्चेअंती चालू बिल भरून बारा गाव पाणी पुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.या योजनेत मोताळा तालुक्यातील राजूर, रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, काबरखेड, हनवतखेड, तपोवन, काळेगाव, पोखरी, फर्दापूर या दुष्काळग्रस्त गावांचा समावेश असून, आता उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची समस्या भयावह आहे. सदर बारा गावच्या सरपंचांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सतत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही वीज पुरवठा सुरू झाला नाही. ही समस्या लक्षात घेता विजयराज शिंदे यांनी बारा गावच्या सरपंच व प्रतिनिधी समवेत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कडाळे यांच्या कार्यालयात कडाळे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरनचे कार्यकारी अभियंता रबडे यांना घेराव घालून या संबंधी जाब विचारला. सविस्तर चर्चा करून सदर वीज बिल चा भरणा करण्याची गरज असल्याने तात्पुरता चालू वीज बिल भरणा ग्रामपंचायतीने करावा व उर्वरित भरणा म.जी.प्रा.ने शासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करून त्वरित करावा, अशा प्रकाराच्या यशस्वी तोडगा काढला. यावर सहमती दर्शवत अधीक्षक अभियंता यांनी चालू वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतींकडून करून घेऊन वीज कनेक्शन  तात्काळ सुरू करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या. याची फलश्रुती म्हणजे पुढील २४ तासात हे वीज कनेक्शन तात्काळ सुरू करण्यात आले. यावेळी विजयराज शिंदे यांच्यासह त्यांच्या समवेत बारा गावचे सरपंच, माधव शिराळ, दिगंबर पवार, राजू पाटील, दिलीप पाटील, सोपान खोटाडे, दादाराव पाटील, ईश्वर शिंदे व इतर ग्रामस्थ तथा ओमसिंग राजपूत, राजू गायकवाड, उद्धव भोंडे, अविनाश शेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vijayraj Shindeविजयराज शिंदेbuldhanaबुलडाणा