शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

दुष्काळी जिल्ह्यांतून बुलडाणा वगळला

By admin | Updated: October 17, 2015 01:50 IST

नजर आणेवारी दाखवली ५९ पैसे; शेतकरी आर्थिक संकटात.

बुलडाणा: ५0 टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र यामध्ये जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही. जिल्ह्यात नजर आणेवारी ५९ पैसे असली तरी दुष्काळाचे सावट सर्वत्र असून, उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. घाटावर व घाटाखाली अशा दोन भागात विभागलेल्या बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कपाशीवर मात करून सोयाबीनचे क्षेत्र वाढले; मात्र यावर्षी पेरणीच्या सुरुवातीला पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे दुबार पेरणी केलेल्या पिकांना पोषक वातावरण मिळाले नाही. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला. एकूण जिल्ह्यातील जवळपास ५0 टक्के उत्पादनात घट आली आहे. काही शेतकर्‍यांचा शेतीला लावण्यात आलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेतही वाढ होत आहे; मात्र शुक्रवारी शासनाने घोषित केलेल्या दुष्काळी गावामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश करण्यात न आल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र निराशा निर्माण झाली आहे. नजर आणेवारी ५९ पैसे असली तरी अंतिम आणेवारी ही ५0 टक्क्यांपेक्षा खाली येणे अपेक्षित असल्याने शासन याबाबत सुधारित निर्णय घेते का, याकडेही लक्ष लागले आहे.