शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : दूध पिऊन नववर्षाचे स्वागत; व्यसनमुक्तीचा दिला संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:50 IST

बुलडाणा: पाश्‍चात्त्य संस्कृतीने नववर्षाची स्वागत करण्याची परंपरा आजच्या युवा पिढीमध्ये रुजत आहे. ती परंपरा मोडीत काढत देशाभिमान बाळगत शिवसंग्राम संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्याकरिता दारू पिणार्‍या युवकांकरिता दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा संदेश देणारा उपक्रम राबविल्या जात आहे. त्या अनुषंगाने ३१ डिसेंबर रोजी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने स्थानिक पत्रकार भवन परिसरात युवकांना दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

ठळक मुद्देशिवसंग्राम संघटनेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाश्‍चात्त्य संस्कृतीने नववर्षाची स्वागत करण्याची परंपरा आजच्या युवा पिढीमध्ये रुजत आहे. ती परंपरा मोडीत काढत देशाभिमान बाळगत शिवसंग्राम संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्याकरिता दारू पिणार्‍या युवकांकरिता दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा संदेश देणारा उपक्रम राबविल्या जात आहे. त्या अनुषंगाने ३१ डिसेंबर रोजी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने स्थानिक पत्रकार भवन परिसरात युवकांना दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. आज देशातील युवा पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून व्यसनांकडे वळत आहे. दारू, सिगारेटसारख्या मादक पदार्थांचे सेवन करून युवा पिढी व्यसनांच्या वाटेवर जात आहेत. अशा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचा संकल्प शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी घेतला असून, संपूर्ण राज्यभर त्यांनी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने ठिकठिकाणी युवकांनी नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन करावे व दारूसारख्या व्यसनापासून दूर राहावे, असा संदेश देणारा दूध वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातसुद्धा  गेल्या दोन वर्षांपासून शिवसंग्राम संघटना हा अभिनव उपक्रम राबवित आहे. शिवसंग्राम संघटनेचे शहर उपाध्यक्ष गणेश भोसले यांनी नवीन वर्षाच्या स्वागताला व्यसनमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने ३१ डिसेंबरला दूध वाटपाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पदाधिकार्‍यांनी सर्मथन देत प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पत्रकार भवन परिसरात अनेकांना दूध वाटप करून नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू नव्हे तर दूध प्या, असा संदेश दिला. यावेळी सुमारे दोनशे जणांनी दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत दारूच्या धुंदीत नव्हे तर शुद्धीत करण्याचा संकल्प केला. अमरावतीचे खा. आनंदराव अडसूळ यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव,  शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड,  डॉ. राजेश्‍वर उबरहंडे, डॉ. आशीष खासबागे, डॉ. शरद काळे, डॉ. सचिन किनगे, डॉ. जुबेर बागवान, डॉ. रामदास भोंडे, राजेश हेलगे, पत्रकार अजय बिलारी, चंद्रकांत बर्दे, अँड. हरिदास उंबरकर, संजय जाधव, सुधीर देशमुख, युवराज वाघ, संदीप वंत्रोले, नीलेश राऊत, विजय चोपडे, शहर उपाध्यक्ष गणेश भसले, संदीप सपकाळे, गणेश सोनुने, राहुल राऊत, अंकुश गायकवाड, अमृत पंडित, मंगेश राजपूत, अमोल देशपांडे, सुरपाटने, शशिकांत भालेराव यांच्यासह असंख्य युवक उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा31st December party31 डिसेंबर पार्टी