शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात जुलैमध्येही सरासरीच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 11:32 IST

Buldana district will received average rainfall in July also : जुलै महिन्यातही सरासरी १७० मिमी ते २०० मिमी दरम्यानच पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या ६ टक्के पावसाची तूट जिल्ह्यात असतानाच जुलै महिन्यातही सरासरी १७० मिमी ते २०० मिमी दरम्यानच पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मर्यादीत स्वरुपातच पाऊस पडणार असल्याचे संकेत आहे.हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या देशातील १९६ जिल्ह्यांमध्ये बुलडाण्याचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास ३० टक्के क्षेत्रावरील रखडलेल्या पेरण्या, पिकांचे जीवन चक्र, प्रकल्पातील जलसाठा पाहता कमी दिवसात येणाऱ्या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती देण्याची गरज असल्याचे मत जिल्हा कृषी हवामान केंद्राचे आहे.दरम्यान, नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाने जुलै पासून दर महिन्याचा पावसाचा अंदाज देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुषंगाने १ जुलै रोजी प्राप्त झालेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १८० ते २०० मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी १८९ मिमीच्या आसपास पाऊस पडतो. त्यामुळे जुलै महिन्यात जिल्ह्यात भरपूर पाऊस पडले असा जनसामान्यांचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात सरासरी ऐवढाच पाऊस पडण्याची शक्यता नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्रातील हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दिवसात येणाऱ्या वाणाला शक्यतो पेरणीसाठी पसंती द्यावी असेही त्यांनी साप्ताहिक कृषी सल्ल्यामध्ये सांगितले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस