शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा तीन जण कोरोनाबाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:06 IST

तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही १३३ वर पोहोचली आहे.

बुलडाणा/मलकापूर: जिल्ह्यात मंगळवारी तीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही १३३ वर पोहोचली आहे. यात हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर शहरात एक, गेल्या काही दिवसापासून निरंक असलेल्या जळगाव जामोदमध्येही एक आणि मेहकर तालुक्यातील डोणगावमधील एका महिला रुग्णाचा समावेश आहे.अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या चार अहवालांपैकी चार अहवाल १६ जून रोजी प्राप्त झाले. त्यापैकी तीन अहवाल हे पॉजिटिव्ह आले तर एक अहवाल निगेटीव्ह आला.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जळगाव जामोद येथील ५६ वर्षीय पुरुष असून मलकापूरातील बहापुरा येथील २४ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. डोणगाव येथील बाधीत महिलेचेही वय २० आहे.जळगाव जामोदमधील द्वारगानगर भाग सील करण्यात आला असून आजपर्यंत जळगाव जामोदमध्ये तीन रुग्ण बाधीत सापडलेले आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला होता.बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ८१ कोरोना बाधीत व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ४७ रुग्ण कोरोना बाधीत असून त्यांच्यावर बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १,८७३ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता १३३ झाली असून पैकी पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. अकोला येथील प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी २५ अहवालांची प्रतीक्षा आहे.

जळगावमध्ये ही एक रुग्णजळगाव जामोद : द्वारकानगर भागातील व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे.पांढºया पेशी कमी झाल्याने व ताप आल्याने खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यास ग्रामीण रुग्णालय व तेथून खामगावला पाठवले होते. १६ जून रोजी त्यांचा अहवाल पॉजिटिव्ह आला. त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटीन करण्यात आले आले आहे.काही रुग्णांना सुटी होण्याची शक्यतामलापूर शहरातील आणखी तीन रुग्णांना १७ जून रोजी सुटी होण्याची शक्यता आहे. हे रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिल्या जाणार आहे. त्यानंतर रुग्णालयात मलकापूरमध्ये दहा जून नंतर सापडलेले रुग्णच राहतील.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर