शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीड पटीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:40 IST

पुर्वी जेथे दररोज सरासरी ३०० चाचण्या होत होत्या तेथे आता ५०० चाचण्या करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीड पटीने वाढविण्यात आला असून पुर्वी जेथे दररोज सरासरी ३०० चाचण्या होत होत्या तेथे आता ५०० चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे बाधीत रुग्ण वाढण्याचे प्रमाणही जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग शाळेतून चाचण्यांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.परिणामी तपासणी अहवाल त्वरित मिळण्यासाठी बुलडाण्यातील आरटीपीसीआरची लॅब कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने वेगाने हाती घेतली आहे. यासंदर्भात प्रयोगशाळेशी संबंधीत आठ तत्रज्ञांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. जालना येथे मध्यंतरी प्रयोगशाळेच्या तंत्रज्ञांनी भेट देवून पाहणीही केली होती. तसेच नागपूर येथून प्रारंभी एक तज्ज्ञ बुलडाणा येथे काही काळा येणार असून त्यांच्या मार्गदर्शनात बुलडाण्यातील प्रयोग शाळेत संदिग्ध रुग्णांचे स्वॅब तपासण्यात येणार आहेत.आगामी आठवड्यात बुलडाण्यातील कोरोना तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत होण्याची शक्यता असून ती प्रत्यक्षात कार्यान्वीत झाल्यास सध्या दररोज प्रलंबीत राहत असलेल्या एक हजार पेक्षा अधिक नमुन्यांचे अहवाल वेळेत मिळणे शक्य होणार आहे. सध्या बुलडाण्यातील संदिग्धांचे नमुने हे अकोला, जालना, नागपूर सह वर्धा येथील खासगी प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यास काहीसा विलंब लागत आहे. त्यातच दीड पटीने कोरोनाच्या चाचण्या जिल्ह्यात वाढविण्यात आल्या आहेत. आता पर्यंत जिल्ह्यातील २४ हजार संदिग्ध रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी प्रत्यक्षात ३, ८४५ जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. येत्या काळात हा वेग वाढणार असून त्यामुळे प्रसंगी रुग्ण संख्याही वाढण्याची भीती आहे. दुसरीकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही अधिक गांभिर्याने घेण्याच्या सुचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

अहवालांची प्रतीक्षा वाढलीकोरोना चाचण्यांचा वेग जिल्हह्यात वाढवण्यात आल्याने दररोज हजार पेक्षा अधिक अहवाल प्रलंबीत राहत आहेत. त्यामुळे संदिग्धांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने अनेकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. बुलडाण्याची लॅब सुरू होण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा