शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:25 IST

Buldhana News इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमात बुलडाणा जिल्ह्याने राज्यात द्वितीय तर अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या  स्वाध्याय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि . प .बुलडाणा यांचे मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक,डाएट बुलडाणाचे सर्व अधिव्याख्याता ,विषय सहाय्यक -समुपदेशक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक  यांची झूमद्वारे आढावा बैठक मागील आठवड्यात घेण्यात आली. त्या बैठकीचा सकारात्मक परिणाम म्हणून स्वाध्याय उपक्रमाच्या १६ व्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्याने राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ .विजयकुमार शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) प्रकाश मुकुंद ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सचिन जगताप यांनी आनंद व्यक्त केला आहे.            जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!-स्वाध्याय उपक्रमाच्या सोळाव्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातून  एक लक्ष एक हजार ५३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी ९३ हजार १५ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले. तर ८८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केले. या उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्याने राज्यात दुसरा तर अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या आठवड्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे .

 

  पुढील काळात बुलडाणा  जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करत बुलडाणा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त  करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.- डॉ. विजयकुमार शिंदेप्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र