शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:32 IST

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या वर्षी अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा पावसाची संतधार सुरू असून गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे. महसूल विभागाकडून यासंदर्भातील सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यातंर्गत बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यात हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने जून महिन्याचा शेवटचा आठवडा व जुलै महिन्याच्या मध्यावर पडलेल्या पावसादरम्यान हे नुकसान झाले आहे.बुलडाणा जिल्ह्यात २३ जून नंतर खºया अर्थाने पावसाने जोर पकडला असून जुलै महिन्यातही पावसाने सातत्यपूर्ण हजेरी जिल्ह्यात लावली आहे. दरम्यान, पुरामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० गावांना गेल्या काही कालावधीत फटका बसलेला आहे. या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे बुलडाणा तालुक्यातील सातही मंडळामध्ये मोठे नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाची आकडेवारी स्पष्ट करते. या प्रकरणी प्रशासनाने त्वरेने नुकसानाच्या सर्व्हेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने महसूल विभागाकडून सध्या हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाला बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्याचे अहवाल प्राप्त झाल आहे. अन्य तालुक्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. प्राप्त अहवालांच्या आधारावर वर्तमान स्थितीत पाच हजार ९०७ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडत असतो दोन आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३६९ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तो ५५.२६ टक्के आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ९० मंडळांपैकी २२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुलडाण्यात सर्वाधिक नुकसानगेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सातही महसूल मंडळामध्ये त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या मध्ये एक हजार ५७० हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. दरम्यान फळबागांसह अन्य पिकांचे असे एकूण एक हजार ६१७ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाचा अहवाल सांगतो. दरम्यन, चिखली तालुक्यात १२ हेक्टर तर मोताळा तालुक्यात ११ हेक्टर असे एकूण एक हजार ६५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार ९०७ शेतकरी प्रभावीत झालेले आहेत. यामध्ये काही शेतकºयांचे नुकसान हे ३३ टक्क्यांच्या आतील आहे. मात्र अशा शेतकºयांची संख्या प्रामुख्याने मोताळा तालुक्यातील आहे.

४१६ विहीरी खचल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा आणि चिखली तालुक्यातील तब्बल ४१६ विहीरी खचल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकट्या बुलडाणा तालुक्यातील ३८६ विहीरी खचल्या आहेत तर चिखली तालुक्यातील ३० विहीरी खचल्याचे तहसिल कार्यालयाने पाठवलेल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे रब्बी हगांमात या शेतकºयांना प्रसंगी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या देऊळघाट सर्कलमधील १६९ विहीरींचे जून महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तर पाडळी आणि धाड सर्कलमधील अनुक्रमे ६६ आणि ५२ विहीरी खचल्या आहेत. बुलडाणा सर्कलमध्ये ११, साखळी बुद्रूक सर्कलमध्ये ३८, रायपूर सर्कलमध्ये ३५ आणि म्हसला बुद्रूक सर्कलमध्ये १५ विहीरी खचल्या आहेत.१९ मंडळामध्ये अतिवृष्टी

पावसाळ््याच्या गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील ९० मंडळापैकी १९ मंडळामध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद असून यामध्ये धाड, लोणी आणि डोणगाव या मंडळामध्ये प्रत्येकी दोनदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. जामोद, संग्रामपूर, पातुर्डा, चिखली, अमडापूर, हातणी, चांधई, पाडळी, म्हसला, अंढेरा, हिवरा, देऊळगाव, अंजनी, नायगाव, टिटवी, बोराखेडी या महसूल मंडळामध्ये प्रत्येकी एकदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती