शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

‘स्वाध्याय’ उपक्रमामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:57 IST

Digital Home assesment पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ६५.६० टक्के विद्यार्थ्यांनी  या उक्रमात सहभाग घेतला.२ लाख ९६ हजार २७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वाध्याय सोडविला आहे. 

- ब्रह्मानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ‘स्वाध्याय’ (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये बुलडाणा जिल्हा प्रथम स्थानावर आला आहे. जिल्ह्यातील ६५.६० टक्के विद्यार्थ्यांनी  या उक्रमात सहभाग घेतला असून २ लाख ९६ हजार २७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वाध्याय सोडविला आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालय बंद झाले असले, तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्वाध्याय हा उपक्रम राज्यात सुरू आहे. स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न नियमितपणे सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन प्रश्न स्वाध्यायमध्ये समाविष्ट करून ते व्हाट्स ॲपद्वारे विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जातात. या स्वाध्याय उपक्रमाच्या अठराव्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातून २ लाख ९६ हजार २७ विद्यार्थ्यांनी  स्वाध्याय सोडविले. त्यानंतर २ लाख ८९ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी ते पूर्णही केले आहे. स्वाध्याय उपक्रमाच्या या १८ व्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्याने राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. जिल्ह्यातील स्वाध्याय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक -समुपदेशक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, मोबाईल टीचर, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक  यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहे.

सामूहिक प्रयत्नांमुळे स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्ह्याला राज्यात प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त झाला, त्याबद्दल आनंद वाटतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांचे शिक्षण भविष्यातही थांबू नये, यासाठी सर्वांकडून असेच प्रयत्न होणे आवश्यक आहे.- भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बुलडाणा.

पर्यवेक्षण यंत्रणेने जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेशी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय यातून हे यश प्राप्त केले आहे. या उपक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना चांगला उपयोग झाला. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र