शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

By admin | Updated: June 13, 2017 19:59 IST

जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुका प्रथम : निकालात मुलींची बाजी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षीसुद्धा दहावीच्या परिक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावून आपला लौकीक कायम ठेवला आहे. जिल्ह्याचा निकाल  ८८.४९  टक्के  एवढा लागला असून जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्याने  ९५.६४ टक्के निकाल घेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.जिल्ह्यातील ४९९ शाळांमधून ४० हजार ७९६ विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ४० हजार ६५२  विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यामध्ये ३५ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा निकाल ८८.४९ टक्के एवढा लागला आहे.  मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४१ एवढे असून मुलींची टक्केवारी ९१.१६ टक्के एवढी आहे. तर मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९७.०१  टक्के एवढे असून जिल्ह्यात हा तालुका ९५.६४ टक्के निकाल देत अव्वल ठरला आहे. तर त्या खालोखाल दे. राजा ९३.७८ टक्के व चिखली ९२.८५ टक्के निकाल देत दुसरा व तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल शेगावचा तालुक्याने ८०.२५ टक्के निकाल दिला आहे. बुलडाणा तालुक्यातून  ४ हजार ५२१ मुले पास झाली. मोताळा तालुक्यातून १ हजार ९०६ विद्यार्थी पास झाले आहे. चिखली तालुक्यात ४ हजार ३८९ विद्यार्थी पास झाले. देऊळगाव राजा तालुक्यात २ हजार १७१ विद्यार्थी पास झाले. सिंदखेडराजा तालुक्यात २ हजार ३६७ विद्यार्थी पास झाले. लोणार तालुक्यात २ हजार ३७८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी २ हजार १५३ विद्यार्थी पास झाले आहे. मेहकर तालुक्यात ४ हजार २४७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी ३ हजार ७४८ विद्यार्थी पास झाले. खामगाव तालुक्यातून ५ हजार ४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी ४ हजार २३८ विद्यार्थी पास झाले. शेगाव तालुक्यात २ हजार १४१ विद्यार्थी पास झाले. नांदूरा तालुक्यात  २ हजार ३६० विद्यार्थी पास झाले. मलकापूर  २ हजार ४५७ विद्यार्थी पास झाले. जळगांव जामोद तालुक्यात  २०१० विद्यार्थी पास झाले. संग्रामपूर तालुक्यात १ हजार ८१६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी १ हजार ५६४ विद्यार्थी पास झाले.