शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:55 IST

CoronaVirus News कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५ टक्क्यांवर स्थिरावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : फेब्रुवारी महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तब्बल १० टक्क्यांनी घसरलेले कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५ टक्क्यांवर स्थिरावले आहे.गेल्या २८ दिवसात जिल्ह्यात कोराेनाचे १० हजार रुग्ण सापडले असून, गेल्या एक वर्षाचा विचार करता तब्बल ४० टक्के रुग्ण हे गेल्या २८ दिवसात सापडल्याने कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात झपाट्याने होत असल्याचे चित्र आहे. परिणामी कोविड केअर सेंटर आणि कोविड समर्पित रुग्णालयात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले होते ते झपाट्याने घसरले होते. त्यामुळे चिंता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले नसले तरी ते ८५ टक्क्यांवर स्थिरावल्याचे चित्र आहे. हा जिल्ह्यासाठी मोठा दिलासा म्हणावा लागले. मात्र, या २८ दिवसात जिल्ह्यात तब्बल ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने काहीशी चिंता निर्माण झाली आहे. मृत्यू पावलेल्या बहुतांश जणांना दुर्धर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेल्या एक वर्षाच्या काळात १ लाख ९२ हजार ५८८ संदिग्धांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरद्वारे १ लाख ३२ हजार १४८, अँटिजेनद्वारे ९,५७७ आणि रॅपिड टेस्टद्वारे ५२ हजार ७९१ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.  यापैकी १३ टक्के अर्थात २५ हजार १३० जण आतार्पंत कोरोना बाधित आढळून आले आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोराेना बाधितांचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असून, १४ मार्च रोजीचा बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तब्बल ३४ टक्के आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या