शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा बँकेला एका महिन्यात बँकिंग परवाना!

By admin | Updated: March 19, 2016 00:43 IST

हर्षवर्धन सपकाळ यांनी वेधले लक्ष; ठेवी परतावा व पीक कर्जासाठी उच्चस्तरीय बैठक.

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून आगामी एका महिन्यात प्राप्त करून घेण्यात येईल. एवढेच नव्हे तर ५१९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यासाठी व पीक कर्जाच्या समग्र धोरणासाठी लवकरच शासन पातळीवर उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्य शासनाच्या वतीने विधानसभेत देण्यात आली. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी १७ मार्च रोजी बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेच्या अनुषंगाने शासनाने ही ग्वाही दिली आहे.जिल्हा बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर केंद्र शासन, नाबार्ड व राज्य शासनाने २0७ कोटींची मदत दोन टप्प्यात वर्षापूर्वी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बँकेचा सी.आर.ए.आर. हा उणे १0.४९ वरून ७.५0 वर आलेला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा बँक रिझर्व्ह बँकेच्या परवान्यासाठी पात्र ठरलेली आहे. मात्र, अद्यापही सदर परवाना प्राप्त झालेला नसून बँकेचे व्यवहार ठप्प आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत आलेला शेतकरी व सर्वसामान्य ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा बँकेचे पुनरुज्जीवन तातडीने होणे आवश्यक असल्याने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. जिल्हा बँकेला खासगी ठेवीदारांचे ३३५ कोटी, जिल्हा परिषदचे १२४ कोटी व विविध बँका तथा पतसंस्थांचे ६0 कोटी, असे एकूण ५१९ कोटींचा परतावा करावयाचा आहे. त्यामुळे बँकेच्या पुनरुज्जीवनासोबतच परवाना प्राप्त झाल्यानंतर ठेवीदारांचा परताव्यासाठी वाढणारा ओघ बँकेसाठी एक आव्हान ठरणार आहे. शासनाकडून मिळालेली मदत व त्या तुलनेत परताव्याची तिप्पट रक्कम लक्षात घेतल्यास पुन:श्‍च बँकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दूरदृष्टिकोनातून कर्ज वसुली व ठेवींचा परतावा यासाठी कालबद्ध कृती आराखडा तसेच धोरण आखण्याची गजर असल्याची बाब आ. सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिली. यावेळी चर्चेत सहभागी होताां आ. डॉ. शशीकांत खेडेकर यांनीसुद्धा त्यास दुजोरा दिला. दरम्यान, आ. सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या उपरोक्त मुद्यांवर अवघ्या एका महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना प्राप्त करून बँकेच्या पुनरुज्जीवन करू, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. यावेळी विधानसभेचे तालिका अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चर्चेत उपस्थित मुद्यांची शासनाने दखल घेत कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.