शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पडला २१८ टक्के अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:30 IST

यंदा एकट्या आॅक्टोबर महिन्यात अवघ्या नऊ दिवसात तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच खरीपाचे मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, हे दोन्ही महिने मिळून जिल्ह्यात सरासरी २१८ टक्के अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळेच खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यात साधारणत: आॅक्टोबर मध्ये ४४.८४ मिमी तर नोव्हेंबरमध्ये २३.२२ मिमी पाऊस पडत असतो. मात्र यंदा एकट्या आॅक्टोबर महिन्यात अवघ्या नऊ दिवसात तब्बल १००.२२ मिमी पाऊस पडला. त्याची टक्केवारी ही २२३.५१ मिमी होती. दुसरीकडे नोव्हेंबर महिन्यात ४७.९७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याची टक्केवारी ही २०६.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस पडला. त्यातही जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे खरीपाचे हाताशी आलेले व शेतात गंजी लावून ठेवलेले पीक नेस्तनाबूत झाले. त्यामुळे बाजार समित्यांमध्येही मालाची आवक कमी झाली असून एकट्या आॅक्टोबर महिन्यात बाजार समित्यांमधील आर्थिक उलाढाल ही ८२ कोटींनी घसरली आहे. त्यावरून या नुकसानाची व्याप्ती निदर्शनास यावी.आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील एकंदरीत पावसाची नोंद पाहता १४८.१९ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारीत तो २१८ टक्के आहे. सरासरी ११ दिवसात हा अवकाळी पाऊस पडला. बुलडाणा तालुक्यात तब्बल १६ दिवस हा पाऊस बरसला तर चिखलीमध्ये १५ दिवस तो बरसत होता. एकट्या चिखली तालुक्यात नेहमीच्या तुलनेत ३१७ टक्के अवकाळी पाऊस बरसला.परतीच्या व अवकाळी पावसाची जिल्ह्यात पडणाऱ्या वार्षिक पावसाच्या सरासरीशी तुलना केली असता ती २२.१९ टक्के येते. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र तो अधिक पडला. चार नोव्हेंबर पर्यंंतची पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरासरीच्या हा पाऊस २२.१९ टक्के आहे. अर्थात सरासरी १४८.१९ मिमी ऐवढी या पावसाची नोंद झाली आहे.नोव्हेंबरमध्ये चांधई, मेहकर, देऊळगाव माळी, बिबी, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सोनुशी, शेंदुर्जन या आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस