बुलडाणा : अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत दर्जेदार कामगिरीच्या जोरावर बुलडाणा येथील सायबर पोलिस ठाण्याने राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत सायबर पोलिस ठाणे बनण्याचा बहुमान पटकावला आहे. १३ मार्च रोजी या पोलिस ठाण्यात यासंदर्भातील आयएसओ ९००१:२०१५ हे मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. राज्यात १५ आॅगस्ट २०१६ रोजी एकाच वेळी सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयी सायबर पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकीच एक बुलडाणा येथील पोलिस ठाणे होते. दरम्यान, २०१७-१८ या कालावधीत तब्बल सात गुन्ह्यांचा तपास करीत बुलडाणा पोलिस ठाण्याने तीन गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार मीना, अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे व पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाण्याच्या या सायबर पोलिस ठाण्याने उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. सायबर गुन्हेगारी व ती रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना, नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी या मुद्द्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून जागृती अभियान राबविण्यात आले होते. दरम्यान, या सर्व पृष्ठभूमीवर सात मार्च रोजी आयएसओ मानांकन देणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधीनी सायबर पोलिस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली. सोबतच तेथील आदर्श अभिलेख व्यवस्थापन, आधुनिक साधनसामुग्री, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, स्वच्छ परिसर, प्रशिक्षीत मनुष्यबळाची पाहणी केली होती. सोबतच १३ मार्च रोजी आयएसओ मानांकन मिळाल्याचे प्रमाणपत्र सायबर पोलिस ठाण्यास दिले.
बुलडाणा सायबर पोलिस ठाण्याला राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत बनण्याचा बहुमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:28 IST
बुलडाणा : अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत दर्जेदार कामगिरीच्या जोरावर बुलडाणा येथील सायबर पोलिस ठाण्याने राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत सायबर पोलिस ठाणे बनण्याचा बहुमान पटकावला आहे.
बुलडाणा सायबर पोलिस ठाण्याला राज्यातील पहिले आयएसओ मानांकीत बनण्याचा बहुमान
ठळक मुद्दे३ मार्च रोजी या पोलिस ठाण्यात यासंदर्भातील आयएसओ ९००१:२०१५ हे मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. बुलडाणा पोलिस ठाण्याने तीन गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.सात मार्च रोजी आयएसओ मानांकन देणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधीनी सायबर पोलिस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली.