शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बुलडाणा : कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:47 AM

बुलडाणा जिल्ह्याच्या २६७ कोटी २५ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेला मोठीच कात्री लागून फेरआढाव्यात ही योजना अवघी ८८ कोटी १९ लाखांच्या मर्यादेवर आली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाची व्याप्तीचे सार्वत्रिक स्वरुपाचे आर्थिक परिणाम समोर येत असून बुलडाणा जिल्ह्याच्या २६७ कोटी २५ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेला मोठीच कात्री लागून फेरआढाव्यात ही योजना अवघी ८८ कोटी १९ लाखांच्या मर्यादेवर आली आहे.त्यातही विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेत येत असलेल्या आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये, मदत व पूनर्वसन, रोहयो, पाणीपुरवठा या मोजक्याच क्षेत्रातील कामांसाठी निधी प्राधान्याने वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परिणामी अन्य विकास कामांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बांधकामाची नवीन कामे घेण्यात येऊ नयेत, अशा स्पष्ट सुचनाच दिल्या गेल्या आहेत. त्यातल्या त्यात १४ मे रोजी आलेल्या परिपत्रकामुळे किमानपक्षी रोहयो आणि पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे.दुसरीकडे योजनेतंर्गतचा नाविन्यपूर्ण निधीमधील पाच टक्के निधीही आरोग्य विभागासाठी वळती करण्याचे संकेत सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. दरम्यान, निधीच्या विनियोजनाचा ठरवून दिलेल्या प्राधान्य क्रमानंतर उर्वरित निधी हा प्रगतीपथावरील व पूर्ण झालेल्या कामांसाठी वापरता ेणार आहे.या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अखर्चित निधीचा तत्काळ आढावा घेऊन शिल्लक निधी शासन जमा करण्यात येणार आहे. सोबतच २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कोणत्याही योजनेचा अखर्चित निधी शिल्लक नसल्याचे संबंधित यंत्रणेकडून प्रमाणित करून घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील अपूर्ण परंतू चालू असलेल्या कामे जर पूर्ण होऊ शकत असतील तरच त्यांना ३३ टक्क्यांचा आराखडा तयार करताना तरतुद करावी, अशा सुचनाही जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत.परिणामी जिल्ह्यात कोणतीही नवीन बांधकामे आता होणार नाहीत. याचा फटका लोणार सरोवर विकास आराखडा, सिंदखेड राजा विकास आराखड्यासही मोठ्या प्रमाणावर बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातच जी कामे सुरू आहे त्याचे नियोजन संबंधित विभागाला निर्धारीत करून दिलेल्या ३३ टक्क्यांच्या खर्च मर्यादेतच करावी लागणार आहे. परिणामी अनेक महत्त्वाकंक्षी प्रकल्पांना, जलसंपदा विभागाच्या काही कामांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Buldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयbuldhanaबुलडाणा