शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बुलडाणा, चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:25 IST

बुलडाणा : डिसेंबर अखेरच बुलडाणा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली असून, बुलडाणा व चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. भूजल अधिनियमांचा आधार घेत ही टंचाई घोषित करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देउपाययोजना करण्याच्या सूचना!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : डिसेंबर अखेरच बुलडाणा जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढली असून, बुलडाणा व चिखली तालुक्यातील १५१ गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. भूजल अधिनियमांचा आधार घेत ही टंचाई घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या ५00 मीटर अंतरामध्ये  व्यक्ती तथा कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, असा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती केली जाऊ नये, असेही उपविभागीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.टंचाई कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मातला, दत्तपूर, सिंदखेड, गिरडा दुसर्‍या टप्प्यात वरवंड, भादोला, भडगाव, सावळा, शिरपूर, देऊळघाट, सुंदरखेड, पिंपळगाव सराई, म्हसला बु. माळविहीर, पळसखेड नागो, पळसखेड नाईक, सव, चांडोळ, गुम्मी, चौथा, रूईखेड मायंबा, घाटनांद्रा, ढासाळवाडी, बोरखेड धाड, चिखला, साखळी बु. हतेडी खु. डोंगरखंडाळा, कोलवड, धाड आणि तिसर्‍या टप्प्यात बिरसिंगपूर, हनवतखेड, जांब, पाडळी, उमाळा, दुधा, दहिद खु. कुंबेफळ, माळवंडी, रायपूर या गावांमध्ये पाणीटंचाई व पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना जारी करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकार्‍यांनी सांगितले.दुसरीकडे चिखली तालुक्यातील ११0 गावात पाणीटंचाई घोषित करण्यात आली असून, भूजल अधिनियम येथे लागू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वैरागड, पिंपरखेड, शेलगाव आटोळ, रानअंत्री, उंद्री, मेरा बु., चंदनपूर, दिवठाणा,  अंचरवाडी, टाकरखेड हेलगा, धोत्रा भनगोजी, मालगणी, डोंगरशेवली, डासाळा, भालगाव, दुसर्‍या टप्प्यात किन्हाळा, अंबाशी, हरणी, मुरादपूर, धोत्रा नाईक, हिवरा नाईक, किन्ही नाईक, काटोडा, हातणी, धोडप, कोलारा, उत्रादा, पेठ, पाटोदा, कारखेड, हराळखेड, शेलसुर, सवणा, गोद्री, चांदई, खैरव, आंधई चांदई, सैलानीनगर, तांबुळवाडी, भोगावतीसह अन्य गावांचा समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोडWaterपाणी