शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : जिल्हा बँकेवर पीककर्जाचा अवघा दोन टक्के भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:16 IST

बुलडाणा : जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा जाहीर झाला असतानाच शेतक-यांची बँक म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पीक कर्जाच्या एक हजार ८७७ कोटी रुपयांपैकी अवघे ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट स्वीकारले असून, एकूण उद्दिष्टांच्या ते अवघे दोन टक्के आहे. परिणामी, यंदा पुन्हा राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतक-यांची भिस्त राहणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीयीकृत बँकांवरच शेतक-यांची मदार जिल्हा बँकेला ५० कोटींचे उद्दिष्ट

नीलेश जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा जाहीर झाला असतानाच शेतक-यांची बँक म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने पीक कर्जाच्या एक हजार ८७७ कोटी रुपयांपैकी अवघे ५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट स्वीकारले असून, एकूण उद्दिष्टांच्या ते अवघे दोन टक्के आहे. परिणामी, यंदा पुन्हा राष्ट्रीयीकृत बँकांवर शेतक-यांची भिस्त राहणार आहे.शेतकरी कर्जमाफीमुळे खस्ता हालतमधील जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला जवळपास १४९ कोटी रुपये मिळून बँकेच्या थकीत कर्जदार ३० हजार शेतक-यांचे सातबारे कोरे झाले आहेत. या शेतकºयांपैकी प्रत्यक्षात जिल्हा बँकेचे उद्दिष्ट पाहता सात हजार ५०० शेतकºयांनाच जिल्हा बँक पीक कर्ज वाटप करू शकते, असे पतआराखड्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. परिणामी, जिल्हा बँकेंतर्गतच्या २२ हजार ५०० शेतकºयांची भिस्त पुन्हा राष्ट्रीयीकृत बँक आणि पतसंस्थांवर राहण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. 

जिल्हा बँकेचा पतपुरवठ्यात हवा ३० टक्के वाटाजिल्हा बँकेच्या ७० शाखा आहेत. वार्षिक पतआराखड्याचा विचार करता ९६० कोटी रुपये अर्थात ३० टक्के वाटा जिल्हा बँकेचा असणे अपेक्षित आहे; मात्र जिल्हा बँकेकडील ठेवी आणि कर्जवाटपाचे प्रमाण पाहता अद्याप जिल्हा बँक त्यादृष्टीने सक्षम झालेली नाही. परिणामी, राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांवर जिल्ह्यातील कृषी पतपुरवठ्याची मदार येऊन पडली आहे. यामुळे या बँकांना पीक कर्ज पुरवठ्यामध्ये तब्बल ८२ टक्के वाटा उचलावा लागणार आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेलाही जवळपास १६ टक्के कृषी पतपुरवठा करावा लागणार आहे.

खरिपासाठी सरासरी ६९ हजारांचे कर्जजिल्ह्यातील तीन लाख २८ हजार ६६५ शेतकºयांना खरिपाचे एक हजार ७४५ कोटी रुपयांचे कर्ज पुढील आर्थिक वर्षात वाटप करावे लागणार आहे. सरासरी प्रती शेतकरी ते ६९ हजार रुपयांच्या आसपास जाते. जिल्ह्यात खरिपात सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र चार  हेक्टर, कापसाचे प्रस्तावित क्षेत्र एक लाख ७५ हजार हेक्टर, तुरीचे प्रस्तावित क्षेत्र ८५ हजार हेक्टर असून, कापूस व तुरीसाठी अनुक्रमे ७३५ आणि २९७ कोटी ५० लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करावा लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या आराखड्यात ओटीएस सभासद गृहित धरलेले नाहीत. ते गृहित धरले असता, केवळ उद्दिष्टाचे आकडे फुगले असतात. प्रत्यक्षात ते साध्य करता आले नसते. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. त्यामुळे तेथील शेतकºयांचे कर्जपुनर्गठण करावे लागेल.  - अरुण चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा सहकारी बँक, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक