शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

बुलडाणा : जलस्रोत बळकटीकरण प्रकल्पासाठी अजिसपूरची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:54 IST

बुलडाणा : वाढत्या पाणी प्रदूषणामुळे निर्माण होणार्‍या समस्या आणि पाण्याच्या जलस्रोत बळकटीकरणाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या योजनेंतर्गत स्वच्छता अभियानात भरीव कामगिरी करणार्‍या बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर गावाची पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने निवड करण्यात आली आहे. त्या दृष्टिकोनातून पुणे येथील प्रायमुव्ह संस्थेने गावाची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देपथदर्शी प्रकल्पाच्या दृष्टीने पुण्याच्या प्रायमुव्ह संस्थेने केली पाहणी

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढत्या पाणी प्रदूषणामुळे निर्माण होणार्‍या समस्या आणि पाण्याच्या जलस्रोत बळकटीकरणाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या योजनेंतर्गत स्वच्छता अभियानात भरीव कामगिरी करणार्‍या बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर गावाची पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने निवड करण्यात आली आहे. त्या दृष्टिकोनातून पुणे येथील प्रायमुव्ह संस्थेने गावाची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.गाव स्तरावर पिण्याचे शाश्‍वत व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे, यासाठी राज्य शासनाच्यावतीने ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेसाठी पथदश्री प्रकल्प म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यातील अजिसपूर ग्रामपंचायतची निवड झाली आहे. या पथदश्री प्रकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून पुणे येथील प्रायमुव्ह संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विद्यमाने २२ व २३ जानेवारीदरम्यान अजिसपूर ग्रा.पं.मध्ये पाण्याचे स्रोत, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने रांगोळीद्वारे नकाशा काढून माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी प्रायमुव्ह पुणेचे अधिकारी चेतन हिरे, बाळासाहेब चव्हाण, सरपंच बाळाभाऊ जगताप, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, शाखा अभियंता मराठे, विस्तार अधिकारी कृषी सोनोने, कनिष्ठ भुजन अभियंता तठ्ठे सचिव समता पाटील यांची उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत सरपंच बाळाभाऊ जगताप, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सचिव ममता पाटील यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील जलनिरीक्षक शरद ठाकूर, शालेय स्वच्छता सल्लागार नवृत्ती शेडगे, स्वच्छता तज्ज्ञ वैभव ढांगे, मनुष्यबळ विकास सल्लागार मनीषा शेजव, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ किरण शेजोळे, पंचायत समिती स्तरावरील समूह समन्वयक वर्षा खैरे, जया गवई हे उपस्थित होते. याबाबतच्या आराखड्यासंदर्भात २६ जानेवारी रोजी आयोजित सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

शाश्‍वत कृती आराखड्यास प्राधान्यपुणे येथील प्रायमुव्ह संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी गावफेरी करून गावातील स्वच्छता, पाण्याच्या सुविधा, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर गाव नकाशा काढून सार्वजनिक पाण्याचे स्रोत आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात प्राथमिक स्तरावर ग्रामस्तरीय पिण्याच्या पाण्याचा शाश्‍वत कृती आराखडा तयार करण्यात आला. 

शाश्‍वत व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी अजिसपूर ग्रामस्थांनी एकजुटीने सहकार्य करावे.- षण्मुखराजन एस,  सीईओ जि.प. बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी