शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : पहिल्याच दिवशी ५ टँकर दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:42 IST

बुलडाणा जिल्ह्यात पाच टँकर मद्याची विक्री झाली अर्थात २८ हजार २६९ लिटरच्या आसपास ही विक्री आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : दीड महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील ९९ मद्यविक्रीची दुकाने उघडल्यानंतर पहाटेपासूनच या दुकानावर मद्य प्रेमींची दारू खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दरम्यान, पहिल्याच दिवशी बुलडाणा जिल्ह्यात पाच टँकर मद्याची विक्री झाली अर्थात २८ हजार २६९ लिटरच्या आसपास ही विक्री आहे.बुलडाणा जिल्ह्यात ७२ देशी, चार वाईन शॉप, २० बिअर शॉपी आणि विदेशी मद्याचे दोन होलसेल विक्रेते व देशी मद्याच्या विक्रीचा एक होलसेलर अशांची दुकाने नियमानुसार उघडण्यात आली होती. मात्र मद्य खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड पाहता फिडीकल डिस्टन्सींगचा फज्जा उडाल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळाले. दरम्यान, सहा हजार लिटरचे एक टँकर गृहीत धरल्यास दीड महिन्यानंतर उघडलेल्या या मद्यांच्या दुकानातून जवळपास पाच टँकर मद्यविक्री झाली आहे.मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत गेल्या काही दिवसापासून ओरड होती. त्यातच जिल्हा रेड झोनमधून आॅरेंज झोनमध्ये आला व केंद्र व राज्याच्या निर्देशानुसार आॅरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्याने सीलबंद मद्यविक्रीस प्रारंभ झाला. बुलडाण्यात दोन दिवस उशिराने ही विक्री सुरू झाली. त्यामुळे मद्याच्या दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मद्य खरेदी करणाऱ्यासाठी आलेल्यांपैकी काहींनी तर कापडी व वायरच्या पिशव्याच सोबत आणल्या होत्या. बुलडाण्यातील संगम चौकातील दुकान मात्र उघडले नाही. त्यामुळे अशा पिशव्या घेऊन आलेल्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकान उघडण्याची वाट पाहली मात्र त्यांना शेवटी खाली हातच जावे लागले. खामगाव शहराबाहेरील सहा दारुची दुकाने सुरू झाली. एमआयडीसीमध्ये तीन, शेगाव रोडवर एक, तायडे कॉलनी व सजनपुरीत एक दुकान सुरू झाले होते. येथे मोठ्या प्रमाणावर मद्यप्रेमीँनी गर्दी केली होती.बुलडाण्यात झाला अनेकांचा भ्रमनिराशबुलडाणा शहरात एक बिअर शॉपी व देशी मद्यविक्रीचेच दुकान सहा एप्रिल रोजी उघडल्या गेले. त्यामुळे मर्यादीत स्वरुपात अनेकांना दारू मिळाली नाही. बुलडाणा शहरातील बसस्थानकानजीकच्या मद्यविक्रेत्याने मात्र पोलिस संरक्षण व सुरक्षेचा मुद्दा समोर करून सहा एप्रिल रोजी दारू विक्रीस नकार दिला. पोलिस प्रशासनानेही त्यांच्याशी चर्चा केली. मात्र जो पर्यंत शासनाने दिलेल्या सुचना व थर्मल स्कॅनिंग मशीनची उपलब्धता झाल्यानंतरच मद्यविक्रीची भूमिका घेतली. त्यामुळे जवळपास २०० मीटर पेक्षा जास्त अंतर गर्दी झालेल्या त्यांच्या दुकानावरील मद्यप्रेमींचा भ्रमनिराश झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत या मद्याच्या दुकानासमोर मद्यप्रेमी ताटकळत उभे होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव