बुलडाणा : डिजीटल इंडिया अंतर्गत आपले सरकार या शासकीय पोर्टल मार्फतजास्तीत जास्त सेवा या नागरिकांना मिळत आहे. बुलडाणा जिल्हा हा डिजीटलइंडियाच्या मार्फत पेपरलेस करून आॅनलाईन सुविधाच्या माध्यमातून शहरातीलनागरिकांना सुविधा देण्याचा शासनाचा आणि नगर परिषद बुलडाणाचा मानस आहे.याचाच एक भाग म्हणून आता नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकामपरवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वीलागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे. त्याअंतर्गत परवानगीसाठी याप्रणालीचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनीकेले आहे.माहिती तंत्रज्ञान विभाग महारार्ष्ट शासन व नगर परिषद यांच्या संयुक्तविद्यमाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदचे अध्यक्ष, मुख्याधिकारी,नगर अभियंता, शहर अभियंता त्याचप्रमाणे घर बांधकाम करणारे अभियंता यासर्वांची कार्यशाळा नगर परिषद सभागृह बुलडाणा येथे आयोजित करण्यात आलीहोती. या कार्यशाळेत नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो.सज्जाद यांनी आधुनिकतंत्रज्ञानाचा फायदा घेवून आधुनिकतेचा सर्व शहर वासीयांनी लाभ घ्यावा वयामध्ये अभियंता यांची खुप महत्वाची भूमिका राहणार आहे. यामध्ये शहरातीलनागरिकांना वेळेत सुविधा प्राप्त होणार आहे ही शहर वासियांसाठी आनंदाचीबाब आहे. विजय जाभाये यांनी या नवीन प्रणालीचे स्वागत करून त्याचा वापरकरण्यासाठीचे आवाहन केले. सुरेश चौधरी यांनीसुध्दा या प्रणालीचा वापरकरण्यासाठी सर्व अभियंते नगर परिषद बुलडाणाला सहकार्य करण्याचे आश्वासनदिले. माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्टÑ शासन यांचेकडून रितेशक्षिरसागर, रघुनंदन राव यांनी उपस्थित सर्व अभियंता प्रशिक्षणार्थी यांनानवीन तंत्रज्ञानची प्रणाली सविस्तर समजावून सांगितली.या कार्यक्रमासाठी सिमाबाई ढोबे अध्यक्षा नगर परिषद जळगाव जामोद,नगराध्यक्ष संग्रामपूर, दिपक सोनुने शिक्षण सभापती, नगरसेवक मो.सज्जाद,अरविंद होंडे, याकुबसेठ, बबलू कुरेशी, नईम कुरेशी, योगेश देशमुख, बांधकामअभियंता राजू जाधव, इंजि.स्वप्नील राजपूत, संजय अहिर, शुभम जाधव,राजेंद्र मुरेकर, दिलीप जोशी, फकीरा जाधव यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन महेंद्र सौभागे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश देशमुखनगर अभियंता यांनी केले. कार्यक्रमासाठी नगर परिषद मधील खाजगी बांधकामअभियंते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बुलडाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 13:37 IST
बुलडाणा : नगर परिषद बुलडाणाच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगीसुध्दा आता आॅनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून यापूर्वी लागणाºया वेळामध्ये वेळेची बचत होणार आहे.
बुलडाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने
ठळक मुद्देबांधकाम परवानगीसाठी नवीन प्रणालीचा लाभ घ्यावा- चव्हाण