शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकानात चोरी करणा-या बुरखाधारी महिला गजाआड

By admin | Updated: November 28, 2015 02:39 IST

चिखली पोलिसांचे यश, मुद्देमालासह दोन महिला अटकेत, एक फरार.

चिखली (जि. बुलडाणा) : सोन्याची अंगठी घ्यायची आहे, अशी बतावणी करीत सराफा व्यावसायिकास फूस लावून दुकानातील साडेचार लाखाचा ऐवज लंपास करणार्‍या तीन बुरखाधारी महिलांचा शोध घेण्यात चिखली पोलिसांना यश आले असून, या चोरी प्रकरणात नाशिक जिल्हय़ातील मालेगाव येथील समकसेर काकुबाईचा बाग या भागातील २ महिला आरोपींना अटक करण्यात आले आहे. एक महिला अद्यापही फरार असून, पोलीस तिच्या मागावर आहेत. दरम्यान, अटकेतील दोन आरोपी महिलांकडून १ लाख ३0 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, न्यायालयाने २८ नोव्हेंबरपर्यंंंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. येथील विशाल आत्माराम टेहरे यांच्या सराफा दुकानात २३ ऑगस्ट रोजी विशाल टेहरे यांचे वडील गणपत टेहरे हे व त्यांचा नोकर संतोष पवार हे दोघेजण दुकानात असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुकानात तीन बुरखा घातलेल्या महिलांनी प्रवेश घेतला व त्यांनी गणपत टेहरे यांना सोन्याची अंगठी विकत घ्यावयाची असल्याचे सांगत अत्यंत शिताफीने सुमारे साडेचार लाखाचा ऐवज चोरून पसार झाल्या होत्या. दरम्यान, या गुन्हय़ातील महिलांनी बुरखा धारण केला असल्याने या चोरीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही.फुटेजचे बारकाईने अवलोकन केल्यानंतर तपासाची दिशा ठरवून संशयीत आरोपी महिलांची गुप्त माहिती घेतली. या महिला नाशिक जिल्हय़ातील मालेगाव येथील समकसेर काकुबाईचा बाग या भागात राहत असल्याचे निश्‍चित झाले. हा भाग पूर्णपणे झोपडपट्टीचा व मुस्लीमबहुल वस्ती असलेला संवेदनशील परिसर, त्यातच बुरखाधारी महिला आरोपींचा शोध घेणे जोखमीचे होते; मात्र ही जबाबदारी ठाणेदार राजपूत यांनी स्वत:वर घेऊन आरोपी महिलांचे वास्तव्याचे ठिकाण व त्यांच्या हालचालींवर तब्बल तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी महिला कर्मचारी सुषमा वुईके व किरण साबळे यांनी बुरखा धारण करून पाणी भरण्याच्या बहाण्याने भल्या पहाटे आरोपी महिलांच्या घरात प्रवेश करून सईदा रहेमतुल्ला अन्सारी वय ४0 वष्रे व साजीदा ऊर्फ अन्नु बशीर अन्सारी वय ३0 वष्रे या दोघींना ताब्यात घेतले. अटकेतील महिलांनी गुन्हय़ाची कबुली दिली असून, त्यांच्याकडून साडेचार लाखाच्या सोन्या-चांदीच्या ऐवजापैकी १ लाख ३0 हजाराचा ऐवज हस्तगत केला. दरम्यान, या प्रकरणातील अन्य एक महिला आरोपी अद्यापही फरार आहे. अटकेतील महिलांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने २८ नोव्हेबरपर्यंंंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यात ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सपोनि विक्रांत पाटील, पोउपनि अशोक चाटे, पोना संदीप सुरडकर, अजय शेगोकार, राजू सोनोने, विजय सोनोने, महिला कर्मचारी किरण साबळे, सुषमा वुईके यांनी भूमिका बजावली.