शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पीय घोषणेनुसार जिल्ह्यास मिळणार ८ रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:25 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची कमी असलेली संख्या पाहता, निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ...

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची कमी असलेली संख्या पाहता, निर्माण होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आरोग्य संस्थांच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, आर्थिक वर्ष संपताना अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बीडीएसवर प्राप्त असलेले अनुदान संक्षिप्त देयकावर काढण्याबाबत परवानी मिळविण्यात आली होती. त्यानुषंगाने आरोग्यसेवा आयुक्तालय स्तरावरून राज्यातील २४३ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका या बुलडाणा जिल्ह्यास मिळणार असून, अल्पावधीतच त्या जिल्ह्यास प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाने ४८ रुग्णवाहिकांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात फक्त ८ रुग्णवाहिका मिळत आहेत. म्हणजेत एकूण मागणीच्या १६ टक्केच रुग्णवाहिका जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती.

-- जिल्ह्यात १०४ रुग्णवाहिका--

जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या २३ असून, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ७, खामगाव सामान्य रुग्णालयात ३, शेगाव उपजिल्हा रुग्णालयात ३, मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात २, ग्रामीण रुग्णालयांमध्ये १४, क्षय आरोग्य धामची एक रुग्णवाहिका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ५२ रुग्णवाहिका आहेत. त्यामध्ये आता या नव्याने येणाऱ्या रुग्णवाहिकांची भर पडून जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची संख्या ही ११२ होणार आहे.

--या पीएससींना मिळणार रुग्णवाहिका--

जिल्ह्यातील नांदुरा, जवळखेड, जामोद, अटाळी, रायगाव, सुलतानपूर, टाकरखेड आणि संग्रमापूर या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्याने येणाऱ्या रुग्णवाहिका मिळणार आहेत. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच या रुग्णवाहिकांचा वापर करणे अनिवार्य राहणार आहे, तसेच या ठिकाणी वाहन चालकाचे पद भरलेले नसल्यास, कंत्राटी तत्त्वावर बाह्ययंत्रणेमार्फत ते भरण्यासंदर्भातही मान्यता देण्यात आलेली आहे.