शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'बीएसएनएल'ला ‘नॉट रिचेबल’चे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:02 IST

बुलडाणा: जिल्ह्यात दूरसंचारला ‘नॉट रिचेबल’चे ग्रहण लागले असून, यात भारत संचार निगम लिमीटेडची (बीएसएनएल) सुविधा मागे पडत आ

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात दूरसंचारला ‘नॉट रिचेबल’चे ग्रहण लागले असून, यात भारत संचार निगम लिमीटेडची (बीएसएनएल) सुविधा मागे पडत आहे. १७ मे रोजी जागतिक दूरसंचार दिनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचारची माहिती घेतली असता जिल्ह्यात खाजगी दूरध्वनीलाच पसंती मिळत असून, बीएसएनएलकडे ग्राहक पाठ फिरवत असल्याची माहिती समोर आली.भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आॅक्टोबर २००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले. परंतू आजरोजी भारत संचार निगम लिमीटेडची उत्तम दर्जाची सेवा कोलमडली आहे. ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या बीएसएनएलला आज अवकळा आली आहे.बीएसएनएलची सेवा वांरवार विस्कळीत होत आहे. गेल्या काही महिन्यापासून तर इंटरनेटची सुविधाही नावालाच उरलेली आहे. भारत संचार निगम लिमीटेड बुलडाणा जिल्हा मुख्य कार्यालयात अनेकवेळा तक्रारी देऊनही त्यावर तात्पुरती दुरूस्ती केल्या जाते; मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होत आहे.दुरसंचार जिल्ह्यात हजारो किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले असून त्याचा लाखो ग्राहक वापर करत आहेत. यातील ७५ टक्क्यापर्यंत ग्रामीण क्षेत्रामध्ये सेवा दिली जाते. परंतु ही सेवा देताना ग्रामीण भागात अनेक अडचणी येत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी महामार्गाच्या कामादरम्यान काढलेल्या फोन लाइनचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाहीत. काही भागातील फोन केबल तोडल्यामुळे सतत फोन बंद असतात. तर अनेक गावामध्ये कुठल्याच कंपनीचे काहीच नेटवर्क मिळत नाही; परिणामी काही लोकांनी बीएसएनएलची सेवा वापरणे बंद केले. बँक व्यवहार वारंवार ठप्पजिल्ह्यात विकासाच्या रस्ता व इतर खोदकामांमुळे विस्कळीत झालेल्या इतर लाईन अजून सुध्दा दुरुस्ती करण्यात आलेल्या नाहीत. या मुळे फोन जास्त वेळ बंदच असतात व शासनाच्या आॅनलाईनच्या कामामध्ये दिरंगाई होत आहे. ग्रामीण भागात बँकेचे व्यवहार वारंवार ठप्प होत आहेत. बँकेतील नेटवर्कमुळे व्यवहार थांबत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांंना व नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBSNLबीएसएनएल