शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजारी बहिणीच्या मृत्यूनंतर भावाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 15:47 IST

नांदुरा: आजारी बहिणीच्या मृत्यूनंतर भावाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना ३१ मे रोजी घडली. या घटनेने समाजमन हेलावले आहे.

- सुहास वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: आजारी बहिणीच्या मृत्यूनंतर भावाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना ३१ मे रोजी घडली. या घटनेने समाजमन हेलावले आहे.नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन परिसराजवळील संत गजानन महाराज मंदिराजवळ सामाजिक जीवनापासून कोसो दूर वयोवृद्ध देशमुख बहिण-भाऊ झोपडीत राहत होते. त्यांचे एकाकी जीवन परिसरातील इतरांसाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरत होता. कुणी त्यांना मदत केल्यास ते स्वाभिमानी स्वभावाचे असल्याने नाकारत असत. त्यापैकी धनुर्धर जगन्नाथ देशमुख (वय ५६) या भावाचा ३१ मे रोजी रेल्वेखाली कटून मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्याचा झोपडीतील वयोवृद्ध बहिणीला देण्याकरिता परिचितांनी त्यांची झोपडी गाठली, तर त्यांना त्यांची बहिण शशिकला जगन्नाथ देशमुख (वय ६३) हिचा जमिनीवर पडलेला मृतदेह दिसून आला. आजारी बहिणीच्या मृत्यूने हेलावलेल्या भावाने आपली जीवनयात्रा संपवण्याचे वास्तव जगासमोर आले. बहिणीचा झोपडीत तर भावाचा रेल्वे पटरीवर मृतदेह पडून होता.त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची आजारी बहीण शशिकला हिला द्यावी, याकरिता एका परिचित व्यक्तीने त्यांची झोपडी गाठली. त्यावेळी त्याला मृतकाची बहिण शशिकला जगन्नाथ देशमुख (वय ६३) हिचा जमिनीवर पडलेला मृतदेह दिसून आला.मृतदेहाची पाहणी केली असता तिचा मृत्यू सुमारे दोन दिवसांपूर्वीच झाला असल्याचे व तिच्या मृत्यूने एकाकी पडलेल्या भावानेही रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले. हे दोन्ही मृतक भाऊ-बहीण परिसरात कोणालाही परिचय न देत व एकाकी जीवन जगण्याचा त्यांचा स्वभाव असल्याचे परिसरातील नागरिक सांगत होते. याबाबतची माहिती परिसरातील काही नागरिकांनी समाजसेवी संस्था ओमसाई फाउंडेशनला दिली . त्यांना कोणीही आप्तेष्ट, मित्र किंवा नातेवाईक नसल्याने त्या मृतक भाऊ- बहिणींवर अंत्यसंस्कार करण्याकरीता ओमसाई फाउंडेशनने पुढाकार घेतला.ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर , प्रेमचंद जैन, सचिन जैन, कमलेश बोके, विक्की नामगे, प्रवीण डवंगे यांनी अंत्यसंस्कारांसाठी परिश्रम घेतले. नगरसेवक प्रमोद गायकवाड व अजय भिडे, सामाजिक कार्यकर्ते विनल मिरगे, रेल्वे कर्मचारी आकाश गायकवाड, पोहेकॉ गजानन सातव , अनिल इंगळे यांनी सहकार्य केले. अविवाहित राहून एकाकी जीवन जगणाऱ्या भाऊ व बहिणीचे हे कुटुंब परिसरातील इतरांचे नेहमीच लक्ष वेधुन घेत होते. त्यांचे दु:ख जाणून घेऊन त्यांना मदत करावी, याकरिता अनेकांनी प्रयत्न केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूराSuicideआत्महत्या