बुलडाणा : विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. मात्र विविध गावांच्या समस्या प्रलंबित असल्यामुळे सतरा गावांनी मतदानाचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चिखली तालुक्यातील अमडापूर, क व्हळा, इसरुळ, मेरा बु., करवंड, सवणा, सुंदरखेड प्रेरणा सोसायटी, भडेच ले आऊट, जांभरुण परिसर, मेहकर तालुक्यातील कासार खेड, नवी मादनी, नांदुरा तालुक्यातील मुरब्बा, शेगांव तालुक्यातील दहीगांव, माळेगाव, राजुर, सिंदखेडराजा तालुक्यातील वसंत नगर, सावखेड तेजन, खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी आदी गावांचा समावेश आहे. या गावातील विविध समस्या अडीअडचणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मार्गी लावल्या नाहीत. त्यामुळे सदर गावकर्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सदर गावांनी बहिष्कार टाकल्यामुळे अनेक ग्रामस् थ मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सतरा गावात मतदानावर बहिष्कार
By admin | Updated: October 15, 2014 00:41 IST