शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खामगावमधील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणी दोघे ताब्यात; आरोपींची दोन तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 16:00 IST

उप जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देउप जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश असून दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली.

खामगाव: येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश असून दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. तर ताब्यातील दोघांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक पथक रवाना केले.

नांदुरा तालुक्यातील वड्नेर भोलजी येथील सुमैय्या परवीन यांच्या पाच दिवसाचे बाळ २७ सप्टेंबरच्या पहाटे एका बुरखाधारी महिलेने पळविले. हा खळबळ जनक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वेगाने चौकशी सुरु केली. आज दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे नवजात बालकाच्या तपासाला गती मिळणार आहे.

नेमकं काय घडलं होतं ?बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसाचे मुल पळविले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. सुमय्या बी नामक महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं ५ मध्ये भरती ठेवण्यात आलं होतं. रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला व तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कारमधून रुग्णालयात दाखल झाले व पाच दिवसाच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला. 

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे  घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे हे रात्री ३:३० वा रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला.