शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चाकूच्या धाकावर लुटणा-या दोघांना अटक

By admin | Updated: March 28, 2016 02:05 IST

नांदुरा पोलिसांची कारवाई; लुटीतील ऐवज जप्त.

नांदुरा (जि. बुलडाणा) : चाकूच्या धाकावर एका व्यक्तीला रेल्वे गेटजवळून रेल्वे मोरीच्या खाली नेऊन साहित्य व रोख रक्कम लुटणार्‍या दोघांना २७ मार्च रोजी रात्री पोलिसांनी अटक केली आणि लुटीतील ऐवज जप्त केला. तालुक्यातील नारखेड येथील सुरेश फुंडकर हे २६ मार्चला रात्री ७ वाजताच्या सुमारास त्यांच्याकडील कामगार दिलीप महादेव सोळंके याच्याजवळ लग्नाचा आहेर, भांडी, कापड, मोबाइल व कूलरची मोटर असे साहित्य दिले आणि त्यास रेल्वे गेटजवळ थांबवून गावात आणखी साहित्य आणण्यासाठी गेले होते. ही संधी साधून आदित्य शत्रुघ्न उंबरकर (१९) व उमेश गणेश चिमकर (दोघेही रा. वॉर्ड नं. १४, आंबेडकरनगर, नांदुरा) यांनी दिलीप महादेव सोळंके याच्या पाठीला चाकू लावला व जिवे मारण्याची धमकी देत, त्यास सर्व साहित्यासह दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्याला दुचाकीवर बसवून भुईशिंगा रोडवरील रेल्वे मोरीच्या पुलाखाली नेऊन त्याच्याजवळील लग्नाचा अहेर, भांडी, रोख रक्कम, मोबाइल हिसकला आणि त्याला तेथेच सोडून दोघे साहित्य घेऊन दुचाकीने पसार झाले. सदर घटनेची माहिती त्याच दिवशी नांदुरा पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवीत नांदुरा येथून दोघांना पकडून त्यांची ओळखपरेड घेतली. तक्रारदाराने साहित्य लुटून नेणारे भामटे ओळखले. पोलिसांनी ह्यबाजीरावह्ण दाखविताच त्यांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला माल जप्त केला. याप्रकरणी दिलीप महादेव सोळंके यांच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांढुरे, गोलाईत, पवार, कश्यप हे करीत आहेत.